ब्रेकफास्ट न्यूज : संस्कृत अंताक्षरी स्पर्धा, प्रिया पेंढारकर आणि सोनाली अडावदकर यांच्याशी गप्पा

Описание к видео ब्रेकफास्ट न्यूज : संस्कृत अंताक्षरी स्पर्धा, प्रिया पेंढारकर आणि सोनाली अडावदकर यांच्याशी गप्पा

चार मित्र किंवा कुटुंबातले सदस्य एकत्र आले की अगदी हमखास खेळण्याचा खेळ म्हणजे, अंताक्षरीचा. आपण आजवर मराठी आणि हिंदी अंताक्षरी खेळला असाल पण संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नागपुरात संस्कृतमधुन अंताक्षरी स्पर्धा आयोजित करण्यात आली. संस्कृत अनेक भाषांची जननी मानली जाते. कारण अनेक भारतीय भाषांमधील शब्द संग्रह संस्कृत भाषेत सापडतात.
-------

नागपुरातल्या संस्कृत सखी सभेने आधी केवळ संस्कृतमध्येच संवाद साधणारे व्हॉट्सअॅप ग्रुप सुरु केले आणि महाकवी कालिदास दिनाचेनिमित्त साधून अंताक्षरी स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेत संस्कृत भाषेतील श्लोक सुभाषिते आणि ओव्यांचा समावेश होता. या ग्रुपचं वैशिष्ट्यं म्हणजे या ग्रुपमधल्या अनेक सदस्यांनी कधीही संस्कृत भाषेचा अभ्यास केलेला नव्हता किंवी त्यांना संस्कृतमध्ये संवाद साधता येत नव्हता पण या ग्रुपच्या सदस्या बनल्यानंतर संस्कृतविषयीची गोडी निर्माण होऊन अनेकजणी आज अगदी अस्खलितपणे संस्कृतमध्यये संवाद साधु शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे या ग्रुपमध्ये विदेशातील काही महिलाही जोडल्या गेल्या आहेत. संस्कृत भाषेचा प्रचार करतानाचा अनुभव, या स्पर्धेची संकल्पना आणि भविष्यातल्या योजनांविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रिया पेंढारकर आणि सोनाली अडावदकर

Комментарии

Информация по комментариям в разработке