हळद आणि आदरक पिकातील कंदमाशी व कंद कूज नियंत्रण | rhizome rot | rhizome fly

Описание к видео हळद आणि आदरक पिकातील कंदमाशी व कंद कूज नियंत्रण | rhizome rot | rhizome fly

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!

👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/

====================================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱हळद आणि आदरक पिकातील कंदमाशी व कंद कूज नियंत्रण | rhizome rot | rhizome fly👍

1️⃣कंदमाशी : - कंद माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असून माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. कंदमाशी खोडाच्या बुंध्याजवळ अथवा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालते. सहा दिवसांत अंड्यातून लालसर रंगाच्या अळ्या बाहेर पडून कंदामध्ये शिरतात. अळ्यांचा शिरकाव कंदामध्ये झाल्याने तिथे रोगकारक बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कंद कूज सुरू होते. कंद मऊ होतात, त्यांना पाणी सुटून ते कुजू लागतात.

👉व्यवस्थापन: -
1. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.
2. भरणी करताना खतासोबत फिप्रोनील ०.३ % दाणेदार ५ किलो किंवा क्लोरँट्रीनिलीप्रॉल ०. ४% दाणेदार ४ किलो प्रति एकर या प्रमाणात जमिनीत मिसळावे.
3. माशी दिसू लागताच क्विनॉलफॉस ३० मि.ली. + निम ऑइल १०००० पी पी एम २० मिली प्रति १५ लिटर या प्रमाणात फवारावे. गरजेनुसार १५ दिवसांनी पुन्हा फवारणी घ्यावी.
4. प्रादुर्भावाची सुरुवातीच्या काळात क्लोरोपायरीफॉस + सायपरमेथ्रीन (धानुका सुपर डी) 40 मिली किंवा डेल्टामेथ्रीन १०० इसी ३० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी.
5. एकरी ३ मातीची अथवा प्लॅस्टिकच्या पसरट भांडी घ्यावीत. त्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम अधिक १.५ लिटर पाणी मिसळून शेतात ठेवावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणातून येणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशा आकर्षित होऊन, त्यात पडून मरतात.
6. कंदांचे नुकसान करण्या अगोदरच कंदमाश्‍या मरत असल्याने विशेष प्रभावी उपाययोजना आहे.

2️⃣कंदकूज: - कंदकूज प्रामुख्याने बुरशी आणि जिवाणूमुळे होते. कंदकुजीचे प्रथम लक्षणे ही कंदातील कोवळ्या फुटव्यावर लगेच दिसून येतात. नवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढल्यास तो मऊ पडून त्यातून घाण वास येणारे पाणी बाहेर पडत असते.

👉व्यवस्थापन: -
1. कंदकूज व्यवस्थापनासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा २ ते २.५ किलो प्रति एकरी ३०० किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून जमिनीमध्ये द्यावे किंवा ड्रीप असलीस ट्रायकोडर्मा २ लिटर प्रति एकरी द्यावे. याचा वापर प्रतिबंधात्मक म्हणूनच करावा.
2. कंदकूजीस सुरवात झाल्यानंतर कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड ४५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. रोगाची तीव्रता जास्त असल्यास मेटॅलॅक्‍सिल + मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) ४५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.
3. आले पिकामध्ये जिवाणूजन्य मर असल्यास सोबत ०.५ ग्राम स्ट्रेप्टोसाक्लीन किंवा २ मिली कासुगामाइसिन प्रतिलिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.
4. आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Комментарии

Информация по комментариям в разработке