सप्तशृंगी देवी ची कथा | माता या गडावर कशी आली ? गडाला सप्तश्रृंगी का म्हणतात ? Vani Saptashurngi

Описание к видео सप्तशृंगी देवी ची कथा | माता या गडावर कशी आली ? गडाला सप्तश्रृंगी का म्हणतात ? Vani Saptashurngi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
आपण या व्हिडिओमध्ये सप्तशृंगी देवी ची कथा पाहणार आहोत
माता या गडावर कशी आली ?
या गडाला सप्तश्रृंगी का म्हणतात ?
या गडाचा संपुर्ण इतिहास पाहणार आहोत

नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे (जगदंबेचे) मंदिर आहे.हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस ५५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्‍यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व - पश्‍चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे, अशी मान्यता आहे. बाकीची तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या.ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते.
पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय.

देवीची मूर्ती ९ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे.देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत.

Saptashrungi Devi Story in Marathi

#saptashrungi
#vanidevi
#saptashrungigad
#aaisaptashrungi
#vaninashik
#navratri2023
#maharashtra
#marathimotivationandhistory



LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या Marathi motivation and history चॅनलला सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि बेल आयकन वर क्लीक करा.

धन्यवाद, जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Комментарии

Информация по комментариям в разработке