ऊस पिकामध्ये पोंगेमर करणारी खोडकीड अळी अवस्था व्यवस्थापन मे 2024

Описание к видео ऊस पिकामध्ये पोंगेमर करणारी खोडकीड अळी अवस्था व्यवस्थापन मे 2024

ऊस पिकामधील लवकर येणाऱ्या खोडकिडीचे व्यवस्थापन
• सद्यस्थितीत नवीन लागवड केलेल्या रोपावस्थेतील ऊस तसेच खोडवा ऊस पिकामध्ये काही ठिकाणी खोड किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ऊस पिकाची पोंगेमर झाल्याचे निदर्शनास येत आहे.
• यावर्षीच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीमुळे पाणी उपलब्धता कमी आहे त्यामुळे लवकर येणाऱ्या खोडकिडीसाठी सध्याचे वातावरण पोषक आहे कारण सदर किडीचा प्रादुर्भाव हा कमी पाणी व जास्त तापमान (37-41 अंश सेल्सिअस), कमी आर्द्रता (40-50 टक्के) या परिस्थितीमध्ये वाढतो.
• खोड किडीचा प्रादुर्भाव ऊस लागवडीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत (कांडी तयार होईपर्यंत) आढळून येतो.
• खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ESB ल्युरसह प्रति एकरी 10 कामगंध सापळे लावावेत.

ऊस पिकामध्ये खोडकिडीमुळे पोंगेमर निदर्शनास येत असल्यास खालील प्रमाणे उपाय योजना कराव्यात.
• उसाला एक ते दीड महिन्यानंतर बाळ बांधणी केल्यास खोडकिडीचे पतंग बाहेर पडणारी छिद्रे बंद होण्यास मदत होईल. पतंग बाहेर पडणार नाहीत.
• खोडकीडग्रस्त ऊस उपटून अळीसह नष्ट करावा.
• रोपावस्थेतील ऊस पिकामधील लवकर येणारा खोडकिडा आणि लोकरी मावा यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% ईसी या पूर्व मिश्रित संयुक्त कीटकनाशकाची 2 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. किंवा Fipronil 5.0% SC (व्यापारी नाव रिजेंट) या कीटकनाशकाची 2 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. किंवा
• क्लोरअँट्रानिलीप्रोल (18.5 टक्के एस.सी.) व्यापारी नाव कोराजन किंवा सिटीजन या कीटकनाशकाची 150 मिली प्रति एक एकर क्षेत्रासाठी 400 लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रीपवाटे आळवणी करावी. किंवा
• क्लोरअँट्रानिलीप्रोल (0.4 जी.आर.) हे दाणेदार कीटकनाशक व्यापारी नाव फर्टेरा किंवा विस्तारा 7 किलो प्रति एकर याप्रमाणे खतामध्ये मिसळून पेरणी करावी.
• शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोंगेमर झाल्यामुळे तुटाळ निदर्शनास येत असेल तर त्या ठिकाणी त्याच ऊस जातीचे रोप लागवड करून तुटाळ भरून काढावी.

Комментарии

Информация по комментариям в разработке