शेततळे अनुदान योजना ! ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस |online from

Описание к видео शेततळे अनुदान योजना ! ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस |online from

शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळेसाठी 75 हजार रुपये अनुदान ! ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस
#शेततळे #अनुदान #anudan
@शेतकरी राजा

Related topics ---------
   • 02/8/2023नाशिक जिल्हा तील कांदा बाजार...   कांदा बाजार भाव
   • 14/08/2023नाशिक जिल्हातील कांदा बाजार...   कांदा बाजार भाव
14/08/2023
https://t.me/+9vOznCA936hkOTk1 टेलिग्राम ग्रुप
shetkari raja.....
महाराष्ट्र तील कांदा बाजार भाव ..
कांदा बाजार भावा विषयी बातम्या......
kanda market bhav information
onian market bhav information
pyaj bhav information

राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असतात, व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे, यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते अशा शेतकऱ्यांना पूर्वसंमती सुद्धा देण्यात आलेली आहे, व वैयक्तिक शेततळे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो, ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या नावावर किमान 0.40 हेक्टर एवढे क्षेत्र उपलब्ध असावे लागते. तसेच योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते व ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करायची याबद्दल संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपण बघणार आहोत.

शेतकऱ्याला शेततळ्याच्या आकारमानानुसार अनुदान दिले जाते जर आकारानुसार दिले गेलेले अनुदान, व शेततळ्यावर होणारा खर्च अनुदानापेक्षा जास्त असेल तर उर्वरित खर्च लाभार्थ्याला करावा लागतो. तसेच जास्तीत जास्त शेततळे खोदण्याचे काम शेतकरी उन्हाळ्यामध्ये करत असतात, शाश्वत सिंचनाचा स्त्रोत म्हणून शेतकऱ्याकडे बघितले जाते, शेती करत असताना पाण्याची उपलब्धता असणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे शेतीला पाण्याचा पुरवठा मिळायला हवा, या कारणांनी शेतकरी आपल्या शेतामध्ये शेततळे खोदतात परंतु शेततळ्याचा संपूर्ण खर्च करणे एकट्या शेतकऱ्याला मात्र परवडणारे नसते व अशातच शासनांतर्गत राबविण्यात येत असणाऱ्या योजना चा लाभ घेऊन शेतकरी शेततळे खोदू शकतात.

शेततळ्याच्या आकारमानानुसार खर्च दिला जातो, त्यामध्ये शेततळे जर,30X30X3 मिटर एवढ्या प्रमाणाचे असेल तर,75 हजार पर्यंतचे अनुदान शेतकऱ्याला दिले जाते. जर शेततळ्याचे आकारमान 15X15X3 मिटर असेल तर 35 ते 50 हजारापर्यंत अनुदान देण्यात येते. आणि 20X15X3 मीटर आकारमाणाचे क्षेत्रफळ असेल तर 50 हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस फॉलो करून शेतकरी अर्ज करू शकणार आहेत.योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे सातबारा उतारा व आठ अ असणे गरजेचे आहे तसेच शेतकऱ्याच्या नावाने एक एकर जमीन असावी


आवश्यक कागदपत्रे – आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, जात प्रमाणपत्र, परीक्षण अहवाल, सातबारा, आठ अ इत्यादी कागदपत्रे



ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या पोर्टलवर जावे, https://mahadbt.maharashtra.gov.in/

यूजर आयडी व पासवर्ड टाकून ओटीपी टाकून लॉगिन करा. पुढच्या पेजवर आल्यानंतर अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करा,

सिंचन साधने व सुविधा या ऑप्शन वर क्लिक करा, सक्सेस वर ओके करून सिंचनाचा स्त्रोत हे ऑप्शन निवडा.

विविध प्रकारचे ऑप्शन दाखवण्यात येईल त्यातील सिंचन स्त्रोत हे ऑप्शन निवडा. व ऊर्जा स्त्रोत यावर क्लिक करा, त्यानंतर मुख्यपृष्ठावर जावे.

ओपन करून विचारली गेलेली वैयक्तिक संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरा. वैयक्तिक शेततळे हे ऑप्शन निवडा, कोणत्या साईज चे शेततळे हवे त्यापैकी निवडा.

मुख्यपृष्ठावर आल्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करून नोटिफिकेशन वर ओके करा. तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल व अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल 23.60 रुपये एवढे पेमेंट करा, अशाप्रकारे पेमेंट केल्यानंतर अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही पूर्ण केलेली असेल.
#Shettale anudan maharashtra
#gr & sheti yojana
#magel tyala shettale
#mahadbt farmer scheme
#mahadbt shetkari yojana
#maharashtra anudan yojana
#shettale yojana 2023 maharashtra
#anudan yojana 2023
#shettale yojana in marathi 2023
##magel tyala shettale guidelines
#shettale online form maharashtra
##shettale estimate in marathi
##shettale plastic paper yojana
##magel tyala shettale yojana anudan
##shet tale plastic subsidy
#mahadbt farmer scheme 2022

Комментарии

Информация по комментариям в разработке