श्री गणपती स्तोत्र | साष्टांग नमन हे माझे | Shree Ganpati Stotra | Sashtang Naman He | Marathi

Описание к видео श्री गणपती स्तोत्र | साष्टांग नमन हे माझे | Shree Ganpati Stotra | Sashtang Naman He | Marathi

श्री गणपती स्तोत्र | साष्टांग नमन हे माझे | Shree Ganpati Stotra | Sashtang Naman He | Marathi










श्री गणपति स्तोत्र

साष्टांग नमन हेंमाझें गौरीपुत्रा विनायका ।

भक्तीनें स्मरतां नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥

प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत तें।

तिसरें कृष्णपिंगाक्ष चवथें गजवक्र तें ॥ २ ॥

पांचवें श्रीलंबोदर सहावें विकट नांव लें।

सातवें विघ्नराजेंद्र आठवें धुम्रवर्ण तें ॥ ३

नववें श्री भालचंद्र दहावें श्री विनायक

अकरावें गणपति बारावें श्री गजानन ॥ ४ ॥


देवनांवें अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।

विघ्नभीति नसे त्याला प्रभो! तूं सर्व सिद्धिदे॥ ५॥

विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन ।

पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्यांला मिळे गति ॥ ६ ॥

जपता गणपति स्तोत्र सहा मासांत हैं फळ ।

एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥

नारदांनी रचिलेले झालें संपूर्ण स्तोत्र हैं।

श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥

Комментарии

Информация по комментариям в разработке