Jejuri |Khandoba Darshan| Ashirwad Khanaval |Peshwai Lodge | MarathiVlog| Best In Jejuri

Описание к видео Jejuri |Khandoba Darshan| Ashirwad Khanaval |Peshwai Lodge | MarathiVlog| Best In Jejuri

पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे (इ.स.१७१२ सालचे) देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. परंतु, औरंगजेबाने १,२५,००० चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत.
सुमारे 200 पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पायऱ्या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्याा व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते. तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.

PUNE TO JEJURI MAP-https://goo.gl/maps/7XYm5rB6DfsqaxoWA

PESHWAI LODGE
100, Malhargad Rd, Jejuri, Pune, Jejuri, India, 412303.
MR.SACHIN PESHVE -9822442043
MAP--https://goo.gl/maps/5kZAQC2zfSVQsqjk6

ASHIRWAD KHANAVAl
मु.पो.जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे आहील्यादेवी चौक,जेजुरी
MR.VISHAL HENDRE--9767392053
MAP--75G5+5G4
https://maps.app.goo.gl/QN6LbUcseWYzr...

Комментарии

Информация по комментариям в разработке