डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसलेली बैलगाडी....आंबेडकरी चळवळीची अस्मिता

Описание к видео डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसलेली बैलगाडी....आंबेडकरी चळवळीची अस्मिता

अस्पृश्यता दूर व्हावी, दलितांनी शिक्षण घ्यावे, संघटित व्हावे व संघर्ष करावा यासाठी भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकर यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी भारतीय राज्यघटना लिहून भारताला लोकशाही व्यवस्था लागू करण्यासाठी मोलाचे कार्य केले. त्यांना यासाठी आयुष्यभर संघर्ष करावा लागला. त्यांनी विविध क्षेत्रात मोलाचे काम करून ठेवले आहे. आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रात त्यांचे काम आहे.
भारताची औद्योगिक प्रगती झाल्याशिवाय शेतीची, शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही, हे डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्यापूर्वी खूप आधी स्पष्ट केले होते. भारतीय रिझर्व्ह बॅंक ही त्यांच्याच संकल्पनेतून साकार झालेली एक महत्वाची बॅंक आहे.
२३ फेब्रुवारी १९४१ रोजी धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावी त्यांच्या अध्यक्षतेखाली महार-मांग वतनदार परिषद झाली होती. दलितोध्दाराच्या चळवळीतील हे एक परिवर्तनाचे महत्वाचे पाऊल होते. या गावात २२ फेब्रुवारी १९४१ रोजी त्यांची गावकऱ्यांनी बैल‌गाडीतून मिरवणूक काढली होती. आज ८३ वर्षे झाली, गावाने ती गाडी जपून ठेवलीय तसेच ते ज्या खोलीत मुक्कामाला थांबले होते, ती खोली स्मारक रुपाने आजही गावकर्यांनी जपून ठेवली आहे. याचा थोडक्यात आढावा या व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे.
हा व्हिडीओ १६ जून २०२४ रोजी शूट केलेला आहे.
आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आम्ही सामान्यांचे प्रश्न मांडतो. आमच्या 'सप्तरंग' चॅनेलला subscribe करा.
धन्यवाद!
#latur
#youtube #meme #viral #explorepage #likes #tiktok #trending #live #hiphop #video #youtube #youtuber

Комментарии

Информация по комментариям в разработке