चेंबर फोडून, रस्त्यावर सांडपाणी सोडून रस्त्याची दुरावस्था. रस्त्याच्या काही भागात अतिक्रमण काढावे.

Описание к видео चेंबर फोडून, रस्त्यावर सांडपाणी सोडून रस्त्याची दुरावस्था. रस्त्याच्या काही भागात अतिक्रमण काढावे.

अहमदनगर शहरांमधील महानगरपालिकेच्या मालकीचे अंडरग्राउंड नालीचे चेंबर फोडून सांडपाणी सोडले तसेच महानगरपालिकेच्या काही रस्त्याच्या भागामध्ये अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण त्वरित काढावे. मोबाईल मध्ये शिटींग काढल्यामुळे शिवीगाळ करून जेव्हा मारायची टाकी दिली.

अहमदनगर शहरांमधील अंतोन शामसुंदर गायकवाड उपसंपादक तेज खबर महाराष्ट्र न्यूज यांनी माननीय आयुक्त साहेब, अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर यांना दिलेल्या तक्रार अर्ज की नागापूर गावठाण मध्ये माझ्या घरासमोर महानगरपालिकेची अंडरग्राउंड नाली असून त्या ठिकाणी चेंबर आहे. त्याला खेटून महानगरपालिकेचा रस्ता आहे. हा रस्ता बारस्कर वस्ती कडे जात असल्यामुळे याला बारस्कर रोड असे म्हणतात. तसेच हा रस्ता स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
माझ्या घरापासून 200 फुटावर राहत असलेल्या 1)अक्षय कांबळे 2)त्याचे आई कांबळे बाई पूर्ण नाव माहित नाही हे राहत आहेत. त्यांनी महानगरपालिकेच्या काही रस्त्याच्या भागामध्ये घर,संडास बांधून अतिक्रमण केलेले आहे. ते कपडे भांडे हे रस्त्यावरच धुतात.त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून रस्त्याची फार मोठी दुरावस्था होऊन ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. या खड्ड्यामध्ये पाणी साचून दुर्गंधी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आमच्या व इथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. हा 1)अक्षय कांबळे 2) त्याची आई कांबळे बाई पूर्ण नाव माहित नाही.हे अतिशय नंगाड, दादागिरी करीत असते तसेच त्यांचा व्याजाचा धंदा असल्यामुळे तिच्याकडे पैसा भरपूर आहे. त्यामुळे हे कोणत्याही नागरिकांना, पुढार्‍यांना, कार्यकर्त्यांना घाबरत नाही. त्यामुळे1) अक्षय कांबळे2) त्याची आई कांबळे बाई यांनी त्यांचे सांडपाणी रस्त्यावर सोडले आहे.हे पाणी रस्त्यावर सोडल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे हे घाणपाणी खड्ड्यामध्ये साचलेमुळे मच्छरे निर्माण होऊन डेंगू, मलेरिया, कावीळ तसेच इतर साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता टाळता येत नाही. आम्ही,येथे राहणार्‍या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे.सांडपाणी घाणपाणी जाण्यासाठी यांनी माझ्या घरासमोर चे महानगरपालिकेच्या मालकीचे अंडरग्राउंड नालीचे चेंबर कोणतीही परवानगी न घेता फोङले आहे. हे कायद्याला भीत नाहीत. कारण की यांच्याकडे गोरगरीब लोकांना दिलेला व्याजाचा पैसा भरपूर येत असल्या मुळे हे कायद्याला भीत नाहीत.
त्यामुळे मी माझ्या तेच खबर महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चैनल मध्ये बातमी बनवण्यासाठी मी मोबाईल द्वारे शिटींग काढत असताना 1)अक्षय कांबळे 2) त्याची आई कांबळे बाई यांनी मला शिवीगाळ करून जीवे मारायचे धमकी दिली आहे. याविषयी मी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये रिसर तक्रार देऊन 504, 506 याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
पण यांच्याकडे पैसा असल्यामुळे हे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची तोंड दाबण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे पोलीसांनी त्यांच्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. म्हणून मी हा तक्रार अर्ज आपल्याकडे करीत आहे.
तसेच यांनी महानगरपालिकेच्या मालकीच्या अंडरग्राउंड नालीचे चेंबर फोडल्यामुळे तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या रस्त्याचे नुकसान केल्यामुळे तसेच रस्त्याच्या काही भागावर घरे, संडास बांधून अतिक्रमण केले आहे. तरी हे अतिक्रमण त्वरित काढण्यात येऊन रस्ता अंतविधी करण्यासाठी नागरिकांना मोकळा करून द्यावी. ही नम्र विनंती.तसेच उद्या चालून कोणताही गुंड प्रवृत्तीचे लोक हे महानगरपालिकेच्या मालमत्तेची रस्त्यावर अतिक्रमण, अंडरग्राउंड नाली वरचे चेंबर चे नुकसान करणार नाहीत. कायद्याला भितील. कायदा हातात घेणार नाहीत. म्हणून तुम्ही ही कारवाई करावी. ही नम्र विनंती.
तसेच यांच्यावर योग्य ते गुन्हा दाखल करावे. ही नम्र विनंती. तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन शामसुंदर गायकवाड यांनी माननीय आयुक्त साहेब महानगरपालिका अहमदनगर यांना दिलेल्या तक्रार अर्ज मध्ये म्हटले आहे.

तेच खबर महाराष्ट्र न्यूज संपादक सौ.शारदा अंतोन गायकवाड मोबाईल नंबर-:9850291672

Комментарии

Информация по комментариям в разработке