NarsinhaSaraswati Stavan | Abhishek Kale नरसिंहसरस्वती स्तवन | अभिषेक काळे

Описание к видео NarsinhaSaraswati Stavan | Abhishek Kale नरसिंहसरस्वती स्तवन | अभिषेक काळे

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी जवळील कर्नाटक सीमेवरच्या "उगार" या गावी वास्तव्य केलेल्या प.पू.नारायणानंद सरस्वती तथा उगारस्वामी यतिमहाराज यांनी रचलेले हे श्रीनृसिंहसरस्वती स्वामींचे अद्वितीय स्तवन

गायक : श्री.अभिषेक काळे

नरसिंहसरस्वती दत्त पादुका कमली
नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।धृ।।

अज्ञानव्याप्त मी भ्रमलो श्रमलो भारी ।
नच आश्रय कोठे दिसतो मज अंधारी।
तव दर्शन होता चिन्ता सारी सरली ।
नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली।।१।।

परमार्थ साधने अनन्त करुनी आले |
सत्संग घडोनी ज्ञानाभ्यासी रमले।
साफल्य तयाचे झाले दर्शन काली।
नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।२।।

वेदान्त ज्ञान जरी शाब्दीक सारे झाले ।
गुरुकृपेवीण ना अनुभवदायी ठरले ।
जाणूनी गुरु तव चरणी भक्ती जडली ।
नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।३।।

जरि प्रसन्न गुरु तरि साधन योग्यचि घडते ।
ये कृतार्थता मग शाश्वत शान्ती मिळते ।
पुरुषार्थ लाभहो विघ्ने आता नुरली ।
नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।४।।

अतिबालपणी जे ध्यान मनी प्रीतीचे ।
नरसिंहसरस्वती यतिवर गुरुराजांचे ।
त्यास्मरणे सात्विक वृत्ती बहु गहिवरली ।
नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।५।।

हे दयानिधे गुरु चरणी आश्रय द्याहो ।
भवसागरी तारा फेरा पुनरपि नाहो ।
यतिनारायण श्री गुरुचरणाते कवळी ।
नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।६।।

Комментарии

Информация по комментариям в разработке