MPSC Topper Success Story: बीडचा शेतकरी पुत्र संतोष खाडे यांनी कशी उत्तीर्ण केली MPSC मुख्य परीक्षा

Описание к видео MPSC Topper Success Story: बीडचा शेतकरी पुत्र संतोष खाडे यांनी कशी उत्तीर्ण केली MPSC मुख्य परीक्षा

#BBCMarathi #MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं नुकत्याच जाहीर केलेल्या MPSC परीक्षेच्या निकालात संतोष खाडे राज्यातून सर्वसाधारण यादीत 16 व्या, तर एनटीडी संवर्गातून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालाय.

संतोष मूळचा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाटचे रहिवासी आहे. त्याचे आई-वडील गेल्या 30 वर्षांपासून ऊसतोडीला जात होते. यंदा मात्र त्यांच्या हातातील कोयता थांबला आहे.

आता पंचक्रोशीत या दोघांनाही क्लास वन अधिकाऱ्याचे आई-वडील म्हणून ओळखलं जातं. पण संतोषसाठी मात्र ते त्याचे अक्का आणि बापूच आहेत. ज्यांनी मोठ्या हिंमतीनं संतोषला शिकवलं आणि क्लास वन अधिकारी केलं.

पाहा त्याची यशोगाथा.

रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - गणेश वासलवार
एडिटिंग - शरद बढे

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке