गगनबावड्यातील निसर्गरम्य रिसॉर्ट || D clouds Resort Gaganbavda Kolhapur

Описание к видео गगनबावड्यातील निसर्गरम्य रिसॉर्ट || D clouds Resort Gaganbavda Kolhapur

#marathi #rohitkhotvlogs #Gaganbavda





'D-Clouds' एक सुंदर रिसॉर्ट जिथे ढग आपल्या भेटीला येतात..! महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गरम्य अशा आपल्या गगनबावडा या गावात एक अतिशय सुंदर, सर्व सुख-सोयींनीयुक्त असे प्रशस्त लक्झरीअस रिसॉर्ट सुरू झालेले आहे. निसर्गप्रेमी लोकांसाठी हे रिसॉर्ट म्हणजे एक पर्वणीच आहे. आजकालच्या आधुनिक जगात निसर्गरम्य परिसर आणि शांतता यांचा आनंद घेणे दुरापास्त झालेले आहे. खास करून मेट्रो सिटीज मध्ये तर निसर्ग सानिध्य आणि शांतता या गोष्टी दुर्मिळ झालेल्या आहेत.
'D-Clouds' या नावाप्रमाणेच हे रिसॉर्ट ढग, धुके यांनी वेढलेले असते. याला कारण म्हणजे, 'D-Clouds' हे गगनबावड्याच्या घाट माथ्यावर निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे तसेच रिसॉर्टच्या आसपास हिरव्यागार वनराईने नटलेले डोंगर आहेत जिथे सदाहरित वृक्ष आहेत. अतिशय शांत व रमणीय असणाऱ्या या परिसरातील डोंगरावर येणारे ढग जणु क्षणभर विसावतात आणि याच रिसॉर्टवरून पुढे जातात. इथे पोहोचताच 'D-Clouds' रिसॉर्टच्या गेट समोरच असणारे हिरवेगार डोंगर आणि पक्षांचा मंजुळ आवाज आपले स्वागत करतात.
रिसाॅर्टमध्ये प्रवेश करताच आतमध्ये प्रशस्त पार्किंग आहे. सुरुवातीला बंगलो आणि नंतर रिसॉर्टचा परिसर आहे. 'D-Clouds' रिसॉर्ट मध्ये स्विमिंग पूल (खास चेंजिंग रूमसह), वॉकिंग ट्रॅक आणि इतर सर्व प्रकारच्या लक्झरीअस सुविधा, 24 तास सेक्युरिटी गार्ड व्यवस्थेसह उपलब्ध आहेत. तसेच 24 तास जनरेटर बॅकअप असल्याने लाईटचा प्रॉब्लेम नाही. या रिसॉर्टचे अजून एक वैशिष्ठय म्हणजे शुद्ध शाकाहारी लोकांची गरज ओळखून हे रिसॉर्ट सुरू करण्यात आले आहे.इथे लक्झरी कॉटेज, डिलक्स कॉटेज, फॅमिली स्टे साठी बंगलो, आणि ग्रुपसाठी डोर्मिट्री अशा चार प्रकारच्या रूम्स उपलब्ध आहेत. आपल्या सोयीनुसार रूम प्रकार आपण निवडू शकता.
इथे विविध प्रकारच्या शुद्ध शाकाहारी लज्जतदार डिशेस बनवल्या जातात ज्यामध्ये लोकल गगनबावड्यात बनवल्या जाणाऱ्या विशेष स्वादाच्या काही डिशेसचा देखील समावेश आहे. अप्रतिम अशा उत्कृष्ठ चवीच्या आणि वेगळ्या डिशेस, सुंदर अँबियन्स, तत्पर आणि प्रशिक्षित व विनम्र स्टाफ ही इथल्या रेस्टॉरंटची ठळक वैशिष्ठ्ये म्हणता येतील. प्रत्येक प्रकारच्या रूम्स मध्ये येणाऱ्या ग्राहकांची गरज ओळखून विविध सुविधांचा समावेश करण्यात आलेला आहे.
रिसॉर्ट जवळ जे हिरवाईने नटलेले डोंगर आहेत तिथे पावसाळ्यात भेट देणे म्हणजे एक स्वर्गसुखच म्हणावे लागेल. कारण हा एक प्रकारचा पावसाळी ट्रेक होतो. त्यामुळे ट्रेकिंगची आवड असणाऱ्या लोकांना याचा पुरेपूर आनंद घेता येईल. नैसर्गिक वाट, जोरदार वारे, व वाटेत असणारे छोटे धबधबे, तुफान पाऊस यामधून आपण डोंगरावर जातो. वरती गेल्यावर दिसणारा अप्रतिम असा आसपासचा परिसर, दूरवर पसरलेल्या डोंगररांगा व दरीमधले दृश्य बघितल्यावर आपल्याला साक्षात स्वर्गात उभे असल्याचा भास होतो. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहून तर आपण हरवून जातो.
गगनबावड्यात आणि आसपास अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यांना तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. गगनगिरी मठ,करूळ घाट, भुईबावडा घाट,व्हॅली आॅफ हार्ट्स आणि लखमापुर डॅम {कुंभी धरण} इथून जवळच आहे जिथे निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केलेली आहे.एकंदरीत थरारक ट्रेक, सुंदर, शांत असा परिसर, अल्हाददायक वातावरण, 'D-Clouds' मधील लक्झरीअस सुख-सुविधा, स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी जेवण आणि शांत-रम्य हिरवागार परिसर आपल्याला एक अतिशय मस्त अनुभव देऊन जातो. एकुणच फॅमिली, कपल्स, निसर्गप्रेमी तसेच ट्रेकिंगची आवड असणाऱ्या लोकांना लक्झरीअस रिसॉर्ट म्हणजे एक अत्यंत छान अनुभव ठरेल यात शंकाच नाही. हे थरारक अनुभव आणि स्वर्ग सुख अनुभवण्यासाठी आपणास प्रत्यक्षात भेट द्यावीच लागेल.
इथे भेट देताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे म्हणजेच इथले बुकिंग फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने होते. तसे कन्फर्मेशन असल्याशिवाय इथे प्रवेश मिळत नाही. म्हणजे आपण ऐनवेळेस जाऊन प्रवेश मिळत नाही. तसेच ओपन रेस्टॉरंट नसल्याने फक्त रेस्टॉरंटमध्ये बुकिंग कन्फर्मेशन असलेल्या गेस्टसाठी खाण्या-जेवण्याची सोय आहे.
या आणि जगाचा अस्पर्शित निसर्गरम्य भाग पाहण्यासाठी सर्वानी ऑनलाइन बुकिंग करून एकदा तरी नक्की भेट द्या.

अधिक माहितीसाठी संपर्क-
D-CLOUDS
The Natures Resort
Mobile No.{Whats App} - 7304058383
Web Site :- www.dclouds.co.in
Email Id :- [email protected]

Other Details - https://g.co/kgs/WMLjGA

Комментарии

Информация по комментариям в разработке