Green Moongdal Khichadi/हिरव्या सालाच्या मूगडाळीची खिचडी/साधी सोप्पी खिचडी/Khichadi/Simple Khichadi

Описание к видео Green Moongdal Khichadi/हिरव्या सालाच्या मूगडाळीची खिचडी/साधी सोप्पी खिचडी/Khichadi/Simple Khichadi

Green Moongdal Khichadi
#moongdalkhichdi
#moongdalkhichdiwithoutpressurecooker
#moongdalkhichdikaisebanaen
#moongdalkhichdiand
#moongdalkhichdirecipeinmarathi
Green Moongdal Khichadi is very simple, easy yet healthy and tasty Indian Recipe. It can be made anytime when you want one pot comfort meal. It is healthy meal which is easy to digest. This khichadi is prepared in many different ways. It can also be made with adding vegetables. But here I have shown it in very basic form using just onion and garlic. This can be helpful for beginners or new learners who want to cook easy yet healthy dish. I hope you will like it.

हिरव्या सालाच्या मूगडाळीची खिचडी

साहित्य:
तांदूळ- १ कप
हिरव्या सालाची मूगडाळ - ३/४ कप
लसूण- ४ ते ५ पाकळ्या ठेचून
कांदा- १ (मध्यम आकाराचा) बारीक चिरलेला
कोथिंबीर - बारीक चिरलेली
तेल- १.५ टेबलस्पून
मोहरी- १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १ टीस्पून
लाल तिखट- १ टीस्पून किंवा चवीनुसार
मीठ- २ टीस्पून किंवा चवीनुसार
गोडा मसाला - १ टीस्पून

कृती:
डाळ व तांदूळ एकत्र पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यात पाणी घालून १० मिनिटे बाजूला ठेवावे.
लसूण ठेचून घ्यावी. कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. १० मिनिटांनंतर डाळ तांदूळातील पाणी काढून टाकून नीट निथळून ठेवावे.
मंद गॅसवर पातेलं तापलं कि त्यात तेल, मोहरी, हिंग, आणि हळद घालून फोडणी करावी. त्यात ठेचलेली लसूण चिरलेला कांदा घालावा व मिनिटभर परतून घ्यावे. नंतर लाल तिखट घालावे. थोडी चिरलेली कोथिंबीर घालून जरासं परतून घ्यावे. आता निथळून घेतलेले डाळ तांदूळ घालावे व पूर्ण एक मिनिट परतून घ्यावे. असं केल्यामुळे खिचडी पचायला हलकी होते. एकीकडे पाणी उकळवून घ्यावे. परतून झाल्यावर त्यात उकळलेले पाणी घालावे. मीठ व गोड मसाला घालावा आणि मध्यम गॅसवर १५ मिनिटे अधूनमधून ढवळत शिजवावे. १५ मिनिटांनंतर चेक करावे. पाणी शिल्लक असल्यास अजूनथोडे शिजू द्यावे. पूर्ण पाणी आटले की उरलेली कोथिंबीर घालून ढवळून नीट मिसळून घ्यावे.
गॅस बंद करून ताटात वाढून त्यावर आवडत असल्यास साजूक तूप घालून खिचडी खायला द्यावी.

टीप:
१) तेलाऐवजी तूप आणि मोहरीऐवजी जिरं घालूनही ही खिचडी करता येते.
२) कांदा लसूण न घालता केली तरी छान लागते.
३) तिखटाऐवजी हिरव्या मिरच्या वापरू शकता. प्रमाण आपापल्या चवीनुसार कमी जास्त घ्यावं.
४) गोडा मसाला वापरणं पूर्णपणे ऐच्छिक आहे.
५) ही खिचडी अधिक पौष्टिक करण्यासाठी यात गाजर, मटार इ. भाज्या घालू शकता.
६) पातेल्यामध्ये शिजवताना जर मऊ खिचडी हवी असेल तर २ कप धान्याला ६ कप गरम पाणी, मोकळी सळसळीत हवी असेल तर २ कप धान्याला ४. ५ ते ५ कप गरम पाणी घालावं (गरम पाणी वापरलं तर खिचडी लवकर शिजते). कुकर मध्ये करायची असेल तर २ कप धान्याला ४.२५ ते ४.५ कप पाणी घालावं व मध्यम गॅस वर तीन शिट्या करून घ्याव्या.

Комментарии

Информация по комментариям в разработке