Lebanon Pager Explosion: Pager आणि Walkie-Talkie नंतर Solar Panel मध्ये स्फोट, हे हल्ले का होतायत ?

Описание к видео Lebanon Pager Explosion: Pager आणि Walkie-Talkie नंतर Solar Panel मध्ये स्फोट, हे हल्ले का होतायत ?

#BolBhidu #IsrealVsHezbollah #LebanonPagerAttack

पेजर आणि वॉकी-टॉकीनंतर, आता लेबनॉनमध्ये सौर ऊर्जा प्रणालींमध्ये स्फोट होत आहेत. गेल्या दोन दिवसांत तीन प्रकारच्या बॉम्बस्फोटात 32 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. इस्रायल कडून होणारी हॅकिंग टाळण्यासाठी लेबनॉनमधील इराण-समर्थित हिजबुल्ला संघटनेचे सदस्य मोबाइल फोनऐवजी पेजर आणि वॉकी-टॉकी वापरतात त्याचाच स्फोट झाला आहे. त्याच वेळी, राजधानी बेरूतमध्ये मोठ्या संख्येने घरांवर सौर यंत्रणा बसविण्यात आली आहे आता त्याचे सुद्धा स्फोट होत आहेत. इस्त्रायलच्या गुप्तचरांनी या पेजर्समध्ये स्फोटकं लपवली होती असा आरोप हेझबोलाने केला आहे. या पेजर्सवर एक संदेश आला आणि क्षणातच सर्व पेजर्सचा स्फोट झाला.

याप्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे. आजवर ड्रोन मधून झालेले हल्ले, विषप्रयोग हे सर्वाना माहिती होत पण यापद्धतीने प्रत्येक टार्गेटपर्यंत पोहोचनें आणि हल्ला घडवून आणणे हे पहिल्यांदाच होत आहे. हा संपूर्ण विषय आणि हा हल्ला खूपच धोकादायक झालेलं आहे. याचीच माहिती जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке