##breakingnews #alamgirnewsahmednagar #news #aajtak #aapkiadalat #bjp #advocate#shivsena#sharadpawar#eknathshinde
मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सुधाकर व्ही. यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालत मध्ये अहमदनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक राष्ट्रीय लोक लोक अदालत मध्ये 56,142 इतकी प्रकरणे निकाली तर 93 कोटी 93 लाख 97 हजार 593 रुपयांची वसुली
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर ,अहमदनगर बार असोसिएशन ,अहमदनगर आणि सेंट्रल बार असोसिएशन ,अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यामाने रविवार, दिनांक 30/ 4/ 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालय, अहमदनगर तसेच सर्व तालुका न्यायालयामध्ये करण्यात आले. सदर राष्ट्रीय लोकअदालतीचा उद्घाटन समारंभ जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथे संपन्न झाला. राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन रोपट्यास पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.सुधाकर यार्लगड्डा हे होते. सदर कार्यक्रमास जिल्हा सरकारी वकील अँड.सतीश पाटील, अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. श्री. संजय पाटील, श्री. कमलाकर जाधव ,पोलीस उपाधीक्षक,अहमदनगर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा. अध्यक्ष,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अहमदनगर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जीवन एक तडजोड आहे, प्रत्येकाने आयुष्यात तडजोड केली पाहिजे. तसेच जास्तीत जास्त प्रकरणे आप आपसांत तडजोड करून मिटवले पाहिजेत असे सांगितले. लोकअदालतमध्ये ग्रामपंचायत ,जिल्हा परिषद, महसूल आणि वीज वितरण, एसटी महामंडळ, बँका ,पतसंस्था ,इन्शुरन्स कंपनी सहभागी होत असतात म्हणून लोकादलात एक महायज्ञ असून त्यामध्ये प्रत्येकाने आप आपले योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मा. श्रीमती भाग्यश्री का. पाटील यांनी केली. समाजातील वंचित, उपेक्षित व दुर्बल घटकांना न्याय मिळण्याकरता लोक आदालत हे उपयुक्त माध्यम आहे असे त्यांनी आपल्या प्रस्तावनेत नमूद केले. लोक अदालतीचा पक्षकारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्व न्यायालयातील दिवाणी व फौजदारी प्रकरणे ,धनादेश/ चेक संदर्भातील प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे कामगार न्यायालयातील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, महावितरणाची समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्याअगोदरची दाखल पूर्व प्रकरणे, आपसी समझोत्याकरिता ठेवण्यात आली होती.
जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथे राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटनाच्या वेळी श्री. सुधाकर यार्लगड्डा,अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, श्री. एस.एस. गोसावी, जिल्हा न्यायाधीश 1, श्रीमती. भाग्यश्री का. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इतर मा. न्यायिक अधिकारी उपस्थित होते
Информация по комментариям в разработке