Gondhal

Описание к видео Gondhal

#navratri #navratrispecial #music #musicvideo #durgapuja #amazonmusic #applemusic #artist #jaimatadi #instagram #jogwa #navratricollection #indianfestival #india #indian #happynavratri #dussehra #art #song #marathi #marathisong #maharashtra #celebration #navratrivibes #traditional #trending #youtube #youtubechannel #youtubemusic #youtuber #shivchatrapati #chatrapati #shivajimaharaj #shivaji #swarajya

।। गोंधळ ।।

गीतकार व संगीतकार-©️ गिरीश पंचवाडकर


या देवी सर्व भुतेषु मातृ रूपेण संस्थितः
नम: तस्यै नम: तस्यै नम: तस्यै नमो नम:॥
या देवी सर्व भुतेषु शक्ती रूपेण संस्थितः
नम: तस्यै नम: तस्यै नम: तस्यै नमो नम:॥

आदिशक्ती माय भवानी तूच जगन्माता
महिषासुर मर्दिनी तूच ग, तारिसी तू भक्ता
संकटात मी तुझे लेकरू, पदराखाली घेss
गोंधळाला ये भवानी,गोंधळाला ये
गोंधळाला ये ग अंबे, गोंधळाला ये ।। धृ ।।

वाजे दिमडी, घुमे ढोलकी, तालावर संबळ
तुझ्याचसाठी अंबाबाई मांडला गोंधळ
दुष्टांचे निर्दालन करण्या अवनी वरती ये ss
गोंधळाला ये भवानी, गोंधळाला ये
गोंधळाला ये ग अंबे, गोंधळाला ये ।। १।।
उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे 2

योगेश्वरी तू, सप्तश्रृंगी तू, तूsच माय भवानी
माहुरगडची तू रेणुका,तू करवीर वासिनी
नवरात्रीला नऊ रूपातील दर्शन देण्या ये ss
गोंधळाला ये भवानी, गोंधळाला ये
गोंधळाला ये ग अंबे गोंधळाला ये ।। २।।
उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे 2

कामक्रोध हे जळोन जावो कृपा तुझी राहू दे
अमुच्या हातून तुझाच आई उदो उदो होऊ दे
शिवरायांची शिवशक्ती तू, धर्म रक्षिण्या ये ss

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितींचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥

शिवरायांची शिवशक्ती तू, धर्म रक्षिण्या ये ss
गोंधळाला ये भवानी, गोंधळाला ये
गोंधळाला ये ग अंबे, गोंधळाला ये ।। १।।

उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे 2
उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे
गोंधळाला ये.......

{तळटीप: सुरूवातीचे दोन संस्कृत श्लोक आणि ऐलमा पैलमा....हे (भोंडला गीत) या पारंपारिक रचना आहेत.
‘निश्चयाचा महामेरु......' ही समर्थ रामदास यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली विशेषणे आहेत.}

©️ गिरीश पंचवाडकर
गीतकार व संगीतकार- गिरीश पंचवाडकर


-----------------------------------------------------------------------------

नादसप्तक संगीत विद्यालय,प्रस्तुत ...

।। गोंधळ ।।

गीतकार व संगीतकार - गिरीश पंचवाडकर
दिग्दर्शक - अक्षय पंचवाडकर

संगीत संयोजक -
नागेश भोसेकर
मिहीर भडकमकर
अक्षय पंचवाडकर

नादसप्तकच्या गायिका -
रूपा इनामदार, मेधा सेनगावकर, तनिका ढवळे
डॉ. आदिती पंचवाडकर- ताले, मयुरी देशपांडे - पंचवाडकर, स्वाती ताले,
तेजश्री सरदेशपांडे, वृषाली अष्टीकर,दीप्ती पोतदार,
रश्मी पन्हाळकर, जान्हवी मोडक, श्रावणी कुलकर्णी,
विदुल परांजपे, संगीता माने, प्रांजली हरकुड,
अपेक्षा कुलकर्णी, सृष्टी धाडगे
आणि
गिरीश पंचवाडकर

ध्वनी मुद्रण -
पंचम स्टुडिओ, पुणे

साऊंड इंजिनिअर -
श्रेयस दांडेकर

ध्वनी मिश्रण -
अजय अत्रे

व्हीडिओज -
चिन्मय बेरी व अनुज यादव

ड्रोन कॅमेरा -
तेजस ताले

वाद्यवृंद -
नागेश भोसेकर -
ढोलकी, संबळ, बगलबच्चा, मादल, डफ ब्रश, घुंगरू, टाळ, तुणतुणे

अक्षय पंचवाडकर -
संबळ, दिमडी

मिहीर भडकमकर -
सिंथेसायजर, जिओ श्रेड

विशेष सहाय्य -
धवल ताले, गौरी पंचवाडकर, नीरज फडके, प्रशांत ताले, तेजस ताले, भारत कोकीळ, शुभम कुलकर्णी, गणेश कडू

गोंधळी - श्रीकांत रेणके
पोतराज - तानाजी पवार

आभार -
श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, पुणे
गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे श्री दत्त ध्यान मंदीर, पुणे
विश्वस्त - दिपक माधवराव मानकर
सौ. वसुधा दिपक मानकर.

आम्ही यांचे ऋणी आहोत:
ऍडवोकेट हेमचंद्र कबरे
संजय दत्तात्रय जोशी
प्रसाद देशपांडे

।। नादसप्तक संगीत विद्यालय कलाकृती ।।

Shiv Tandav Stotram -
   • Shiv Tandav Stotram  

Jogwa -
   • Jogwa  

Shree Swami Samartha Tarak Mantra -
   • Shree Swami Samartha Tarak Mantra (Na...  

Комментарии

Информация по комментариям в разработке