प पू मंदाताईंची अमृतवाणी

Описание к видео प पू मंदाताईंची अमृतवाणी

🚩 सोमवार दि २९ जुलै रोजी नांदेड सिटी मध्ये प पू गुरु मंदाताई गंधे यांचे प्रवचन🚩


परमश्रद्धेय , आदरणीय प. पू. मंदाताई या वेदांताच्या गाढ्या अभ्यासक आणि जाणकार अधिकारी व्यक्तिमत्व आहेत. अमरावती येथील या संत संपूर्ण वेळ जगद् गुरु श्री शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञान, संतांचे विचार , आणि धर्मकार्य यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं महान कार्य करीत आहेत. त्यासाठी असंख्य विषयांवर , असंख्य अभ्यासवर्ग त्यांनी भारतासहित अमेरिका, दुबई, सिंगापूर, जकार्ता इ. अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतले आहेत .
यूट्यूबवर मंदाताई गंधे असे टाईप केल्यास उपनिषदे, दासबोध, भगवद् गीता, गोपीगीत इ. अनेक विषयांवर त्यांची प्रवचने उपलब्ध आहेत.

आपल्या नांदेडसिटीत त्या प्रथमच येत आहेत , त्यांचे हलक्या फुलक्या, रसाळ वाणीतून होणारे प्रवचन ऐकण्याचे सौभाग्य आपणा सर्वांना लाभणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवतीला सर्वांचा चहापान होईल, ठीक ६.१५ वाजता कार्यक्रम सुरु होईल.

स्वागत, सूत्रसंचालन : सौ वैशाली इनामदार
स्वागतगीत : सौ प्राजक्ता सरदेशमुख

प पू मंदाताईंचा परिचय : सौ अर्चना कौलगुड

६.३० ते ८.३० प पू मंदाताईंची अमृतवाणी-
विषय— संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ

*त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल.

सर्वांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित रहावे पाऊस असला तरी कार्यक्रम वेळेत होईल
कार्यक्रम स्थळ: सरगम क्लब हाऊस
दि. २९ जुले 2024 सोमवार संध्याकाळी ६ ते ८.३०
          🙏🙏🙏

DevMajha.com DevMaza.com dev maza swami samarth, dev maza, dev majha, dev maza shankar baba देव माझा देवमाझा devmaza devmajha #devmajha #devmaza #swamisamarth #swamimath #देवमाझा puja vidhivrat video, marathi upaay, Daily marathi vlogsMarathi videoes, Informative video, Marathi Youtube channel

Комментарии

Информация по комментариям в разработке