गडचिरोली होणार स्टील सिटी ऑफ इंडिया..|Surjagad Steel plant |Loksparsh news

Описание к видео गडचिरोली होणार स्टील सिटी ऑफ इंडिया..|Surjagad Steel plant |Loksparsh news

वडलापेठ येथे ३५० एकर जागेवर १० हजार कोटी रुपयांचा स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे ३५० एकर जागेवर १० हजार कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.

प्रमुख अतिथी म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, पार्थ पवार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलतांना म्हणाले गडचिरोली जिल्हा हा भविष्यात राज्यातील सर्वात अग्रेसर जिल्हा असेल, असा विश्वास व्यक्त केला.

सुरजागड इस्पात कारखान्यामुळे आठ दशलक्ष टन लोह उत्पादन होईल. लायड मेटल्स कंपनीद्वारे चार दशलक्ष टन उत्पादन आधीच होत आहे. त्यामुळे भविष्यात लोखंडाचे तीस टक्के उत्पादन एकट्या गडचिरोली होईल.
#loksparsh #gadchiroli #gadchirolirising #atmanirbharbharat #steelindustry #gadchirolisteelplant #surjagadsteelplant

Комментарии

Информация по комментариям в разработке