Maharashtra Land Record: 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे?

Описание к видео Maharashtra Land Record: 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे?

जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते.
ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. पण, हे उतारे कसे पाहायचे कसे, पाहा ही गावाकडची गोष्ट.
सध्या ही सुविधा 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे. यामध्ये अकोला, अमरावती, धुळे, मुंबई उपनगर, नाशिक, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.

लेखन, निवेदन : श्रीकांत बंगाळे
एडिटिंग : राहुल रणसुभे


___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке