बाजाराला विकण्या निघाली - गौळण | Bajarala wikanya nighali - gaulan

Описание к видео बाजाराला विकण्या निघाली - गौळण | Bajarala wikanya nighali - gaulan

गाण्याचे बोल:-

बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
गं बाई गं दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या ग दुधात नाही पाणी || धृ ||

गोकुळच्या त्या गाई म्हशींचं
खाणं सगळं रान माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशाविना घेणं गं बाई गं
पैशाविना घेणं बाई माझ्या गं
दुधात नाही पाणी || १ ||

यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुखतिया पाठ
नेहमीच याची भारी कटकट
थांबू नका गौळणी गं बाई गं
थांबू नका गौळणी बाई माझ्या गं
दुधात नाही पाणी || २ ||

महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुकली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
देवा लीन होऊनी गं बाई गं
देवा लीन होऊनी बाई माझ्या गं
दुधात नाही पाणी || ३ ||

नवरात्रोत्सव २०२२
सौ. शुभा हिंगमिरे धनकवडी पुणे यांच्याकडे नवरात्रोत्सवानिमित्त झालेली पहिल्या दिवशीची सेवा...

Комментарии

Информация по комментариям в разработке