Uddhav Thackeray यांच्यासोबत जाण्याचा Vasant More यांचा निर्णय, Vidhan Sabha साठी फायदा की तोटा ?

Описание к видео Uddhav Thackeray यांच्यासोबत जाण्याचा Vasant More यांचा निर्णय, Vidhan Sabha साठी फायदा की तोटा ?

#BolBhidu #VasantMore #UddhavThackeray

४ जुलैला वसंत मोरेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि आता मी पूर्वीच्या पक्षात जात असल्याचं म्हटलं. त्यामुळं वसंत मोरे आता ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालंय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला राम राम ठोकत वंचितकडून पुणे लोकसभा लढवणा-या वसंत मोरेंनी फक्त तीन महिन्यांत दुस-यांदा पक्षांतर करण्याचा निर्णय घेतलाय. ९ जुलैला ते अधिकृतपणे ठाकरे गटात प्रवेश करतील, असं त्यांनीच सांगितलंय. पण वसंत मोरेंनी वंचित सोडण्याचा आणि ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही पक्षांतून खदखद व्यक्त केली जातेय. सोशल मीडियावर टीका होत आहेत.

वंचितच्या मतदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मला स्वीकारलं नाही. लोकसभेत त्यांनी प्रमाणिकपणे काम केलं नाही. त्यामुळे मी पक्ष सोडत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलंय. त्यामुळं वंचितच्या पदाधिकाऱ्यानं तर वसंत मोरे यांचं कात्रज इथलं कार्यालय फोडण्याची धमकी दिलीय. तर मोरेंना उद्धव ठाकरे यांची भेट मिळाल्यावर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी टीका केली. पण मोरेंनी ठाकरे गटात जात नेमके कोणते डाव टाकलेत? त्यांच्यापुढे कोणती आव्हानं असणार आहेत? पाहुयात या व्हिडीओमधून.



चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке