SOLAPUR | शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक ; वधू-वर मंडळ चालक महिला, एजंट ताब्यात

Описание к видео SOLAPUR | शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक ; वधू-वर मंडळ चालक महिला, एजंट ताब्यात

Loknayak News
----------------------------------------------------------------------------------------
#marathinewsupdates
#लोकनायकन्यूज
#लोकनायक_न्यूज
#Loknayaknews
#Loknayak_news
#jitendramahajan
#jitendra_mahajan
#marathilivenews
#marathilive
#मराठीबातम्या
#ताज्याबाताम्या
#ब्रेकिंगन्युज

#breakingnews
---------------------------------------------------------------------------------------------------
लोकनायक न्यूज : संपादक - जितेंद्र महाजन
------------------------------------------------------------------------------------------------------
लोकनायक न्युज वरील बातम्या मिळविण्यासाठी आपण संपादक जितेंद्र महाजन यांचा मो.९४२३४९२५९९ क्रमांक आपल्या व्हॉट्स अप ग्रुप मध्ये समाविष्ट करू शकतात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
खालील लिंक वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा
https://chat.whatsapp.com/Hrd7GppIf3L...
---------------------------------------------------------------------------------------------------------------
Follow Us :

Website : https://www.loknayaknews.com
------------------------------------------------------------------------------------
लोकनायक न्यूज वरील इतर बातम्या पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून subscribe बटन वर क्लिक करा
https://bit.ly/3AHBQAW
----------------------------------------------------------------------------------------------------------
Facebook Page :   / loknayaknews  

Instagram :   / loknayak_news  

Twitter :   / loknayaknews  
----------------------------------------------------------------------------------------
Contact Us:
#JitendraMahajan
Mo. 9423492599
Email: [email protected]

SOLAPUR | शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक ; वधू-वर मंडळ चालक महिला, एजंट ताब्यात

ANC - लग्नाळू युवकांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फी घेऊन फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार बार्शीत उघडकीस आला.याप्रकरणी पोलिसांनी कथित वधू-वर मंडळ, चालक महिलांसह एजंटास बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकाराने बार्शी शहरामध्ये खळबळ उडाली आहे. बार्शी तालुक्यातील बायपास रोडवर एका मंगल कार्यालयात सुशिक्षित मराठा महिला वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यासाठी तालुक्यातून हजारो महिला,पुरुष,पालक आणि लग्नाळू मुले वेगवेगळ्या वाहनांनी या ठिकाणी आलेले होते.या सर्व पालक आणि मुलांना तुम्हाला आज या ठिकाणी मुलगी दाखवली जाईल,तसेच मुलगी पसंत पडताच लगेच लग्न लावून दिले जाईल,असं सांगितले होते. यातील कित्येक पालकांचा हा तिसरा मेळावा होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना नवरी काही पहावयास मिळाली नव्हती. मार्चपर्यंत आपणास नक्की मुलगी मिळेल, असे सांगितले जात होते. मेळाव्यात सर्वांसमोर मुलांची नावे पुकारून बोलवले जात होते.बऱ्याच पालकांना आपली काहीतरी फसवणूक होत आहे,असे लक्षात आल्याने त्यानी जागरुक नागरिकांना फोन करून सांगितले.जागरुक नागरिक येताच काहीतरी गडबड आहे. या ठिकाणी लोकांच्या भावनेशी खेळून खोटी आश्वासन दाखवून फसवणूक होत असल्याची बाब लक्षात येताच ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. एका कथित महिला वधू-वर सुचक मंडळाने आयोजित केलेल्या वधू- वर मेळाव्यासाठी बार्शीसह भूम, परंडा, वाशी, करमाळा, कळंब आदी तालुक्यांतील शेकडो लग्नाळू आले होते.या युवक आणि पालकांकडून पैसे घेऊन फसगत झाल्याची बाब उघडकीस आली आहे. या पालकांच्या आणि मुलांच्या व्हॉट्सअॅपवर काही बायोडाटा, मुलींचे फोटोदेखील पाठवले होते, मात्र २४ तासांत ते फोटो डिलीट केले जात होते.यासोबतच कित्येक पालकांना तुम्ही लग्नाच्या तयारीनिशी या तुम्हाला मुलगी पसंत पडल्यास लगेच लग्न लावून देऊ किंवा आमच्या बीड येथील अनाथ आश्रमात काही मुली आहेत, त्यादेखील आपणास दाखवू आणि आपले लग्न दाखवून देऊ, असे आमिषही दाखवले गेले होते. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे वधू-वर सुचक मंडळ हे नोंदणीकृत नाही,तसेच या मंडळाने आजपर्यंत एकही लग्न लावून दिलेले नाही.केवळ आश्वासने दिलेली' असल्याचे यावेळी पोलिसांच्या वधू-वर -मंडळ चालक असलेल्या महिलेच्या बोलण्यावरून दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ सदरची महिला आणि त्यांचे दहा-बारा एजेंट यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये नेले. पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती. फसवणूक झालेल्या पालकांचे जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नातेवाइकांकडून रजिस्ट्रेशन फी म्हणून प्रत्येकी हजार रुपये आणि डिपॉझिट म्हणून तीन ते दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याची बाबदेखील पुढे आली आहे.

BYTE - जनार्दन शिरसाठ (पोलीस निरीक्षक, बार्शी)
BYTE - अंजली चौधरी (लग्नाळू मुलाची आई)
BYTE - प्रभाकर जरांडे (लग्नाळू मुलगा)
BYTE - अलका गव्हाणे (लग्नाळू मुलाची आई)

Комментарии

Информация по комментариям в разработке