कोकणातील सुंदर तालुका - राजापूर | राजापूर तालुक्यातील सुंदर गाव - आडिवरे | जेवायला आडिवरेमध्ये गेलो

Описание к видео कोकणातील सुंदर तालुका - राजापूर | राजापूर तालुक्यातील सुंदर गाव - आडिवरे | जेवायला आडिवरेमध्ये गेलो

श्री महाकाली खानावळ | shree mahakali khanaval
पत्ता - आडिवरे | राजापूर | कोकण
9270337105
7410735123


नमस्कार मंडळी ,
आज आम्ही अचानक बाहेर जेवायचं प्लॅन केला , पण कुठे जायचं तेच समझत नव्हतं,चक्क १ तास लागला जेवायला कुठे जायचं ,शेवटी ठरलच कि जेवायला जायचं ते पण आडिवरे मध्ये .आडिवरे हे गाव कोकणातील राजापूर तालुका मध्ये आहे आणि कोकणात प्रसिद्ध गाव ओळखले जाते आणि सुंदर गाव म्हणून ओळखले जाते.आडिवरे गाव हे प्रख्यात श्री महाकाली देवी साठी खूप प्रसिद्ध आहे आणि मंदिर सुद्धा खूप सुंदर आणि सुरेख आहे .
दुपार नंतर आम्ही घरातून निघालो आडिवरे ला जायला ,निसर्ग खूप सुंदर झाला होता कारण पावसाचे दिवस होते पण पाऊस नव्हतं त्यामुळे निसर्ग अजून सुंदर वाटत होता. आमच्या गाव पासून आडिवरे गाव २०-२५ किलोमीटर अंतर आहे .जाताना दोन रस्ते आहे एक म्हणजे कोतापूर मार्गे आहे आणि दुसर म्हणजे देवीहसोळ मार्गे आहे ,पण आम्ही नेहमीच रस्ता घेतला देवीहसोळ वरून जायचं कारण देवीहसोळ हे गाव सुद्धा खूप सुंदर आहे आणि परिसर सुद्धा बघायला मिळतो कारण डोंगराच्या वरच्या बाजूला म्हणजे सडा आहे तिकडून जायला लागत ..सह्याद्रीच्या डोंगर रंग तिकडून खूप सुंदर दिसतात ..
गाडी मध्ये मी आणि माझी बायको दोघे मस्त निसर्गाचं आनंद घेत चाललो होतो आणि मजा मस्त मस्ती करत चाललो होतो ..बोलता बोलता कधी आडिवरे गाव आलं कळलेच नाही ..
पोटामध्ये कावळे ओरडत होते म्हणजे खूप भूक लागलेली ,मग काय लगेच आम्ही जेवायला गेलो श्री महाकाली खानावळ आडिवरे ह्यांच्याकडे ..मस्त चिकन ची ऑर्डर दिली आणि मस्त जेवणारवर ताव मारला .जेवण खूप मस्त होते आणि घरगुती जेवण .तिकडून निघालो आणि आडिवरे गावच्या मध्य बिंदू ठिकाणी आलो आणि मस्त आडिवरे गावचा ड्रोनशॉट घेतला .
मंडळी तुम्ही कोकणात येत असाल तर नक्की राजापूर तालुका फिरा कारण राजापूर तालुका मध्ये बघण्या सारखं खूप आहे आणि आडिवरे adivare गावा मध्ये या आणि श्री महाकाली मंदिर मध्ये देवी आईचे दर्शन घ्या.

ड्रोनशॉट droneshot घेऊन झाल्यावर परतीचा प्रवास आमचा चालू झाला .

#कोकणातील
#सुंदरतालुका
#राजापूर
#राजापूरतालुक्यातीलसुंदरगाव
#आडिवरे
#जेवायलाआडिवरेमध्येगेलो

Join this channel to get access to perks:
   / @pranalisunilvlog  

Комментарии

Информация по комментариям в разработке