आम्ही जातो आमुच्या गावा 😭 वै.ह.भ.प.डाॅ.वेणुनाथ महाराज वेताळ/ अंत्ययात्रा 😭🙏

Описание к видео आम्ही जातो आमुच्या गावा 😭 वै.ह.भ.प.डाॅ.वेणुनाथ महाराज वेताळ/ अंत्ययात्रा 😭🙏

Venunath maharaj vetal
गणेश महाराज कुदळे यांनी गायला वेणुनाथ महाराजांसाठी ह्रदय हेलावणारा अभंग 😢😭
आम्ही जातो आमुच्या गावा/आमचा राम राम घ्यावा 🙏🙏🙏🙏🙏 😥
😥   • झाला शेवट हा गोड 😭 , वै. वेणुनाथ महार...   झाला शेवट हा गोड 😢
महाराजांचे जाणे अतिशय मनाला दु:ख देणार आहे. ह.भ.प.डाॅ.वेणुनाथ महाराज वेताळ ,मिरीकर.
महाराजांचे जीवन अतिशय प्रेरणा देणारे होते. खरचं संत,साधु कुणाला म्हणतात, तर महाराजांच जीवन पाहिल तर ते कळेल. संत एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात की. आवडे देवासी तो एका प्रकार/ नामाचा उच्चार रात्रंदिन //तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा /हृदयी कळवळा वैष्णवांचा// अशा प्रकारचे जीवन डॉक्टर महाराजांचे होतं.// कोणाही जीवाचा न घडो मत्सर// असे जीवन महाराजांचे होतं. अतिशय प्रामाणिक आणि आपला व्यवसाय करून महाराजांनी परमार्थ केला आणि या परमार्थाचं उच्च टोक महाराजांनी गाठलं आणि ते शेवटी संतपनाला जाऊन पोहोचले. जीवन जगावं तर महाराजांसारखं आणि मरावं तर महाराजांसारखं असं आदर्शवत जीवन महाराजांचं होतं.!! शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी!! असं म्हटलेलं आहे ते काही खोटं नाही. नामस्मरण करत करत मरण यावं असं सगळ्यांनाच वाटत असतं .पण जो व्यक्ती आयुष्यभर खरा परमार्थ करतो त्यालाच ते मरण प्राप्त होतं .माणसाने आयुष्यभर कसं जगावं हे महाराजांनी स्वतःच्या कृतीतून करून दाखवलं आणि माणसाने कसं मरावं , माणसाला कसं मरण यावं हेही महाराजांनी स्वतःच्या कृतीतून करून दाखवलं. 15 दिवसांपूर्वी महाराजांना भेटलो ,महाराजांच्या घरी जाण्याचा योग आला, गेल्याबरोबर महाराजांनी नाष्टा केल्याशिवाय येऊ दिलं नाही .मलाही खूप वेळ कमी होता ,महाराजांनाही वेळ नव्हता, तरीही महाराज 30 मिनिट माझ्याबरोबर बोलत होते. वेगवेगळे विषय बोलता-बोलता अध्यात्मिक विषयावर भरपूर चर्चा झाली. नाशिकला मला आश्रमावर जाण्याची त्यांनी प्रेरणा दिली .अध्यात्मिक चर्चा करता करता महाराज बोलून गेले म्हणाले गणेश महाराज असंच परमार्थ करत करत ,राम भजन करत करत मरण यावं एवढीच आता इच्छा राहिली आहे.त्यानंतर थोड्या वेळाने संसाराचा विषय निघाला महाराजांनी सांगितलं मुला मुलींचे खूप चांगलं झालं आता एक मुलीचं लग्न करायचं आणि राम राम करत आपला देव सोडायचा . हे दुसऱ्यांदा महाराज बोलले आणि मला महाराजांनी आपल्या भक्तीधाम वर नेलं .भक्ति धाम वर गेलो असताना महाराजांनी पूर्ण भक्तीधाम दाखवला .त्यानंतर त्यांच्या अध्ययनाची रूम दाखवली आणि महाराज तिसऱ्यांदा बोलले आता भगवंताला एवढीच इच्छा की राम राम करत आपला देह संपवायचा. एवढ्या 30 मिनिटाच्या चर्चेमध्ये महाराजांनी तीन वेळेस वैकुंठाला जाण्याचा विषय घ्यावा हे त्याच वेळेस मनाला भावून गेलं .क्षणभर वाटलं महाराजांना विचाराव महाराज तुम्ही तीन वेळेस असं बोललात म्हणून. पण मोठ्या व्यक्तीचा अधिकार मोठा असतो त्यामुळे मला असं बोलण्याचं धाडस झालं नाही .तेव्हा कधी असं वाटलं नव्हतं की पंधरा दिवसानंतर महाराज खरंच वैकुंठाला जातील. आणि महाराज आपल्यातून निघून गेले. महाराजांची कधीच आयुष्यामध्ये लबाडी नाही. खोटेपणा नाही, शुद्ध अंतकरणाने एकदम शुद्ध परमार्थ महाराजांनी सतत केला. कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून, भागवत कथा श्रीराम कथा ,संत चरित्र कथा ,असे वेगवेगळ्या विषयावर महाराजांचे प्रबोधन समाजासाठी अतिशय मोलाचं होतं .आज पर्यंत खूप समाजाला सुधारण्याचे काम महाराजांनी केलं. येणारी पिढी ही महाराजांच्या हातून घडली असती परंतु ते घडवण्याच्या अगोदरच महाराज आपल्यातून निघून गेले.वेताळ महाराजांचे गुरू.प.पु .वै.उंबरेकर महाराज यांनी महाराजांना आपल्या जागेवर शेवटी बसवलेच.
//कृपा कटाक्षे न्हाहाळीले //आपुल्या पदी बैसविले //
महाराजांचे जाणे हे मनाला खूप वेदना देणार आहे .प्रत्येकावर महाराजांच असलेले प्रेम प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आणतं. पुन्हा असे महाराज होणे नाही. महाराजांना श्रद्धांजली म्हणून आज हा अभंग गाण्याचा प्रयत्न केलेला आहे .हीच खरी माझ्यातर्फे महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏😭 राम कृष्ण हरी 🙏🙏आपला ह भ प गणेश महाराज कुदळे मो 9767111311

Комментарии

Информация по комментариям в разработке