Bailpola /4K Video/बैलपोळा कोठुरे/bull animal festival Maharashtra 2020 HD.

Описание к видео Bailpola /4K Video/बैलपोळा कोठुरे/bull animal festival Maharashtra 2020 HD.

भारतभर पाेळा वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जाताे.वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानी पाेळा साजरा केला जाताे.महाराष्ट्राला तर विशेष सांस्कृतीक परंपरा लाभलेली असल्याने महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जाताे.पाेळ्याची खरी तयारी हि त्या दिवशी नसुन पाेळ्याच्या आधी १०-१२ दिवस आधी असते. लहान मुलांमध्ये आपला लाडका सर्जा लाडकी हम्मा सजवण्याची विशेष स्पर्धा असते.पाेळ्याचा दिवस उजाडताे आणि दावणीला हात घातला जाऊन सरळ सगळा लवाजमा अंघाेळीला निघताे.सगळ्या गावाचेच सर्जा-राजा तिथे आलेले असतात आणि मग मागच्या वर्षी भेटलेले ते ह्या वर्षीही काही हितगुज करुन घेतात. ढवळ्याला सजवायला गंमत येते , मग त्यावर बटाटा , किंवा कांदा चिरून ताे रंगात बुडवून त्याचे शिक्के त्याच्या पाठीवर मारले जातात.आधीच रुपवान असलेला ढवळ्या अजुनंच खुलू लागताे. शिंगाना धार काढणे , झुल आणणे , जुनी वेसण बदलून नवीन वेसण घालणे , चह्राट बदलणे बाशिंग आणणे हि कामं आधीच तयार असतात.हळू हळू ढवळ्या एक एक आभुषण अंगावर चढवून सज्ज हाेताे मारुती मंदीरात जाण्यासाठी. एरव्ही मालकाशिवाय कुणालाही जवळ येऊ न देणारे सुवासीनींकडून शांतपणे आेवाळुन घेतात.दर पाच किमी वर जशी भाषा बदलते तशा प्रथा हि बदलतात.काही गावांत बैलांना दारु पाजण्याची प्रथा आहे,खरे तर हे चांगले नाही पण असाे.काही ठिकाणी बैलांची मिरवणूक एका दिवशी आणि गाय आणि वासरांची मिरवणूक दुसर्या दिवशी काढतात. काही ठिकाणी मानाची बैलजाेडी हि विशिष्ट घराण्यांकडेच सांभाळण्याची प्रथा आहे.विविधतेने नटलेला आणि एकतेचा संदेश देणारा आपला महाराष्ट्र.ह्या गावाेगावच्या प्रथांमध्ये कितीही वेगळेपणा असला तरी त्यांचा आत्मा मात्र एकंच आहे.ताे म्हणजे कृतज्ञता.
गेल्या काही महिन्यांपासून हवालदिल झालेल्या परीस्थितीतही शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण कायम आहे कारण आज पाेळा आहे.बैल पाेळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा पुर्वी इतक्या फुलल्या नाही, गजबजल्या नाही हे खरे असले तरी त्यामुळे शेतकरी राजाचा उत्साहात काही बदल झालेला नाही.कारण पाेळा हा शेतकरी आणि त्याला शेतीत मदत करणार्या प्राण्यांची एकमेकांप्रती असलेली कृतज्ञता व प्रेम व्यक्त करण्याचा सण आहे.गावाेगावी पाेळा हा असाच उत्साहात साजरा हाेणार आहे.ज्यांच्या घरी पशुधन नाही ते दरवर्षीप्रमाणे मातीच्या बैलांची प्रतिकात्मक पुजा करतील.

सर्वांना बैलपाेळ्याच्या हार्दीक शुभेच्छा.
असा आमचा हा पाेळा सण ..भुतदया शिकवणारा , आनंदाची उधळण करणारा.

💐🙏🏻पवन पाथरकर
#cowvideos
#วิดีโอวัว
#viralvideos
#Balirajache_leker
#bailpola2020
#बळीराजाची_लेकरं
#cow
#buey

Комментарии

Информация по комментариям в разработке