भाग ४७ | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | BHAJAN SANGRAH |

Описание к видео भाग ४७ | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | BHAJAN SANGRAH |

२३१.
तुझ्या स्वरुपी सदा आनद ।
अनुभवती संत स्वच्छंद ।।धृ0।।
गोविंद म्हणा गोविद ।
सगळेची चश हा छंद ।।
तोडोनी भेद भव द्वंद ।
अविस्मरणी कोंदला नाद।। तुझ्या0।।१।।
विषयाची वासना गेली ।
मोह माया भावना मेली ।।
ब्रह्मानंदी टाळी वाजली ।
आता उरला एक गोविंद ।। तुझ्या0।।२।।
नयनातूनी वाहती धारा ।
गहिवरला कंठ हा सारा ।।
रोमांच उठोनी शरीरा ।
तुकड्या म्हणे,सुखस्वानंद ।। तुझ्या0।।३।।

२३३.
देव आपुले अंतरीं। आम्ही जातो तीर्थावरी ॥
देव आम्हासी पाहतो। आम्ही धोंडोबा पूजतो ॥
देव आम्ही प्रकाशितो । आम्ही अंधारी राहतो।
तुकड्या म्हणे कैसे जुळे?। जोवर अज्ञान ना टळे।।

२३४.
हावऱ्या मना ऐकेना, मज गुरु - भक्ती करु देना ।।धृ0।।
का करितो नश्वर चिंता, सोडुनी सख्या भगवंता ।
गेले वय बघ आता आता, मुकले धन-पुत्रा कांता ।।
समजुनी बोध घेईना, मज गुरु-भक्ति करु देना! ।।१।।
ही बघ रे मोठी माडी, अणि घरात जरिची साडी ।
हातात रुपेरी काठी, सेवेला नोकर पाठी ।।
हे जागिच पडले बघना, मज गुरु-भक्ती करु देना ! ।।२।।
बांबुची चौकट करुनी, निजविले यास त्यावरुनी ।
बांधले जबर दोरींनी, तो पुन्हा न येवो म्हणूनी ।।
कोणास दया येईना, मज गुरु-भक्ति करु देना ! ।।३।।
फुंकतील त्याला सरणी, पाहती सगे नेत्रांनी ।
नच आड येतसे कोणी, राहू द्या जरा तरी म्हणुनी ।।
कुठले रे काका-नाना, मज गुरु-भक्ती करु देना ! ।।४।।
जे प्रभु-भक्तिने धाले, षड्विकार त्यांचे मेले ।
सेवेस्तव रिजले-झिजले, त्यांनीच मृत्युला जिंकले ।।
अजुनहि कीर्ति त्यांची ना,मज गुरु-भक्ती करू देना ! ।।५।।
म्हणूनीच सांगतो नमुनी, लाग रे गुरुच्या ध्यानी ।
तरशिल या दुःखातूनी, सुख पावसी जन्मोजन्मी ।।
तुकड्या म्हणे चल सोडीना,मज गुरु-भक्ती करू देना! ।।६।।

२३५.
खंजेडी! खंजेडी!! मेरी रोज बजेगी खंजेडी।।टेक ।।
सुनने वाले आओ न आओ ।
वाहवा हो या गालि सुनाओ।।
उसकी न जाती बात नडी ।। खंजेडी0 ।।१।।
रूखी हो या सूखी रोटी ।
अच्छी हो या फटी लँगोटी ।।
होय अंधारी या उजडी ।। खंजेडी0 ।।२।।
साथी हो कोरड बजवैया ।
तबला -पेटी झाँज धरैय्या ।।
गवैय्या से नहीं बात अडी।। खंजेडी0।।३।।
प्रेम पुकारो, सबके संग हूँ ।
नहिं तो अपने रंग में रंग हूँ ॥
अपने दिल की जोड कडी ।।खंजेडी0 ।।४।।
श्रध्दा-भक्ती का दिल गम है
मस्त फकिरी का भी दम है ।।
आतम के संग तार चढी ।। खंजेडी0।।५।।
तुकड्यादास कहे,जब बजती ।
पत्थर की भी छाती लजती।।
गुरु किरपा से रहे चढी ।। खंजेडी0।।६।।

Комментарии

Информация по комментариям в разработке