Shewalyachi Karandi Takun Keleli Bhaji( शेवळ्या ची करंदी घातलेली भाजी)

Описание к видео Shewalyachi Karandi Takun Keleli Bhaji( शेवळ्या ची करंदी घातलेली भाजी)

शेवळ्या ची करंदी घातलेली भाजी

साहित्य - वाटलेली कुडक,4 चमचे चिंचेचा कोळ, 1 चमचा गरम मसाला,चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद, 4 चमचे काश्मिरी मिरची पावडर,2 चमचे घरगुती मसाला,1 चमचा लिंबूरस,1/2 चमचा हिंग,तळून घेतलेले शेवळ 6 जुड्या, ओली करंदी1 वाटी,थोडी कोथिंबीर,2 हिरव्या मिरच्या,10-12लसूण पाकळ्या,1/2इंच आलं, सुकं खोबरं 1 मूठ, 3 कांदे,कापलेले,4 पळी तेल.

कृती- प्रथम शेवळ साफ करून बारीक चिरून घ्यावी. कुडक कापून घेऊन वाटून घेणे. बारीक चिरलेली शेवळ कुरकुरीत तळून घ्यावी. Frypan मध्ये तेल तापल्यावर हिंग घालून त्यात marinate केलेली करंदी टाकून 2 मिनिटे परतून घ्यावी व त्यात कांदा घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावे. त्यात हिरवे वाटण ,थोडीशी हळद,काश्मिरी मिरची पावडर ,चिंचेचा कोळ टाकून करंदी चांगली 5 मिनिटे परतवून सुखी झाल्यावर गॅस बंद करणे.आता कढईमध्ये तेल टाकणे ,तेल चांगले तापल्यावर त्यात हिंग घालुन त्यात चिरलेला कांदा टाकणे.कांदा चांगला लाल झाल्यावर त्यात हिरवे वाटण टाकून परतणे. त्यात वाटलेली कुडक घालून परतणे ,त्यात हळद, काश्मिरी मिरची पावडर, घरगुती मसाला,गरम मसाला घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे व परतणे त्यावर तळून घेतलेली शेवळ टाकून चांगले परतून घ्यावे मग त्यात एक पेला गरम पाणी घालून एकजीव करावे आणि झाकण ठेवून 10 मिनिटे शिजण्यास ठेवावे. भाजी शिजल्यावर त्यात परतलेली करंदी,कांदा खोबऱ्याचे वाटण,चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ टाकून सर्व मिश्रण एकजीव करावे, आता त्यात आवडीनुसार पाणी घालावे ,रस्सा पाहिजे असल्यास जास्त पाणी घालावे आणी सुके हवे असल्यास कमी पाणी घालावे पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटे शिजण्यास ठेवावे.आता आपली झणझणीत, चमचमीत करंदी घातलेली शेवळाची भाजी तयार.

Комментарии

Информация по комментариям в разработке