07/09/2024
दिंडा/ लहान दिंडा
(हिं., बं. ढोलसमुद्र; क. दिंडलमर; ढोल समुद्रीका; लॅ. लीआ मॅक्रोफिला; कुल–व्हायटेसी). सु. ३०–९० सेंमी. उंचीची ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), मोठी, हिरवट, बारीक शाखायुक्त ⇨ ओषधी भारतातील उष्ण भागांत सर्वत्र आढळते. शिवाय ब्रह्मदेश, थायलंड, लाओस येथेही आढळते. मूळ लाल, बहुवर्षायू व ग्रंथिल (गाठाळ); पाने साधी, अंडाकृती–ह्रदयाकृती, फार मोठी, खालची ६० सेंमी. व वरची १५–२३ सेंमी. व्यासाची, दातेरी किंवा काहीशी विभागलेली. फुले पांढरी व गुलुच्छासारख्या वल्लरीत [→ पुष्पबंध] जुलै–सप्टेंबरात येतात. सामान्य लक्षणे ⇨ व्हायटेसी कुलात (द्राक्ष कुलात) वर्णिल्याप्रमाणे. मृदुफळ बारीक, काळे, ६–८ सेंमी. व्यासाचे, गोलसर बसके, ३–६ खंडित असून बिया चपट्या असतात. पानांची भाजी करतात व पत्रावळीसारखा त्यांचा उपयोगही करतात.
फळे खाद्य. लाल मुळे (श्लेष्मल (बुळबुळीत, स्तंभक (आकुंचन करणारी) वेदनाहारक असून जखमा, नायटे, गजकर्ण, नारू इत्यादींवर उपयुक्त. त्यांच्यामुळे रक्तस्त्राव थांबतो. ब्रह्मी लोक रक्तस्त्राव थांबविण्यासाठी ती जखमांवर लावतात.
दिंडा हेच नाव लीआ वंशातील इंडिका (सँबुसीना) जातीस लावलेले आढळते; परंतु तिचे ‘कर्कणी’ हे नाव प्रचारात असून खरे दिसते (हिं. कुर्कुरजिव्हा; क. अंदिलू). या लहान वृक्षाचा अथवा १–४ मी. उंच झुडपाचा भारतात दिंड्यापेक्षा अधिक प्रसार आहे. शिवाय ते अंदमान, फिलिपीन्स, चीन, इंडोचायना, श्रीलंका आणि मलाया येथेही आढळते.
पाने (३८–५० सेंमी. लांब) संयुक्त, पिसासारखी (२–३ वेळा विभागलेली); दले दातेरी (७·५–२०X४–९ सेंमी.); फुले पांढरी; फळे (६–८ मिमी. व्यासाची) जांभळट काळी, साधारणपणे दिंड्याप्रमाणे. पाने आणि फळे खातात. पानांचे खत बनवितात. खोडातील ⇨ भेंड वनस्पति विज्ञानाच्या प्रयोगशाळेत वनस्पतींच्या भागांचे छेद घेण्यास (‘एल्डर पिथ’ ऐवजी) उपयुक्त असते. मुळे शीतकर (थंडावा देणारी), स्वेदकारी (घाम आणणारी) असून जुनाट अतिसार, शूल (तीव्र वेदना), आमांश (आव) इत्यांदीवर देतात. भोवळ आल्यास पाने भाजून डोक्यास लावतात.
संदर्भ : Kirtikar, K. R.; Basu, B. D. Indian Medicinal Plants, Delhi, 1975.
लेखक: परांडेकर, शं. आ.
07/09/2024
नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. दिंडा डिना, किंवा दिंडी ही रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
माझी इतर रानभाजीची विडीओ :-
रानभाजी दिंडा कोवळ्या कोंबाची भाजी
• रानभाजी सराटा। गोखरू। पावसाळ्यातील आर...
रानभाजी कुडा, सफेद कुडा:-
• रानभाजी कुडा । सफेद कुडा। दही कुडा।રા...
रानभाजी सावर दोडा :-
• रानभाजी सावर दोडा।काटेसावर। उन्हाळ्या...
रानभाजी सावरफूल
• रानभाजी सावर। काटेसांवर। शाल्मली। वसं...
रानभाजी केकत कोंब
• रानभाजी केकत कोंब। घायपात। उन्हाळी रा...
रानभाजी अबईच्या शेंगा
• रानभाजी अबईच्या । अभयच्या शेंगांची भा...
रानभाजी माठ/चोपडा माठ
• रानभाजी माठ। कॅल्शियम युक्त रानभाजी। ...
रानभाजी काकोत /चाकवत
• Ranbhaji Kakot। चाकवत।गावाकडील दुर्मि...
रानभाजी चिल / चंदन बटवा
• रानभाजी । चिल । चंदन बटवा। रानभाजी ब...
रानभाजी तिवस /तिळीस फुल
• रानभाजी तिवस। तिळीस। वसंत ऋतूतील आवडत...
रानभाजी कुणेरी/ कुंजरा
• रानभाजी कुणेरी। कुंजरा। शेतातील रानभा...
रानभाजी गाभोळी
• ranbhaji gaboli । रानभाजी चाईचा मोहर।...
रानभाजी गोखरु :-
• रानभाजी गोखरु। सराटा।शारीरिक कमजोरी द...
रानभाजी चुच
• रानभाजी चेच। चूच। जुलाबावर उपयुक्त रा...
रानभाजी कुर्डू
• रानभाजी कुर्डू । बहुगुणी कुर्डू ची पा...
रानभाजी चाईचा मोहर
• राणभाजी | गाबोळीची भाजी | उळश्याचा मो...
रानभाजी खुरासणी
• Видео
गावठी अळुची भाजी
• गावठी अळूची पातळ भाजी । अळूचे फदफदे ।...
रानभाजी करटुले
• रानभाजी । करटुली।कंटोळी गावाकडील पध्...
रानभाजी आघाडा
• रानभाजी।आघाडा । सोनारु। गावाकडील रान...
रानभाजी चिचूरडा
• रानभाजी । चिचूरडा । Ranbhaji । Chichu...
रानभाजी तांदूळजा
• राणभाजी तांदूळजा। तांदूळका । तांदळया।...
राजगिरा भाजी
• रानभाजी राजगिरा । भरपूर कॅल्शियम असणा...
Credit For background music
all credit for background music is goes to YouTube audio music library
please visit to YouTube audio library
Below Link:- / @myfreeknowledge2961
#रानभाजीबाफळी
#रानभाजीओळख
#गावाकडचीचव
#रानभाज्या
#रानभाज्यामाहिती
#wildvegetables
#रानभाज्यामहोत्सव
#Ranbhajimahiti
#Ranbhajirecipes
#Ranbhajimahiti
Информация по комментариям в разработке