ह भ प Dr. जलाल महाराज सय्यद करंजीकर

Описание к видео ह भ प Dr. जलाल महाराज सय्यद करंजीकर

*श्री संत शेख महंमद महाराज ३२४ वा संजीवनी समाधी सोहळा व श्री संत शेख महंमद महाराज यात्रा महोत्सव निमित्त भव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व योग संग्राम ग्रंथाचा पारायण सोहळा निमित्ताने सोमवार दि ७\३\२०२२रोजी ह.भ.प डाॅ जलाल महाराज सय्यद करंजी यांचे पाचव्या दिवसांचे किर्तन सांगताना अतिशय सुंदर असा आळंदी येथील शांततेचे संदेश देणारे श्री संत ज्ञानेश्वर महारांजाचा अभंग घेवुन त्यावर पुष्प गुंफले अभंग पुढीलप्रमाणे योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहता पाहता मना न पुरे धणी॥१॥

देखिला देखिला गे माये देवाचा देवो । फिटला संदेहो निमाले दुजेपण ॥२॥ ।।

अनंत रूपे अनंत वेषें देखिला म्यां त्यासि । बाप रखुमादेवी -वरूं खुण बाणली कैसी॥३॥ महाराज अभंगाचे सार सांगतात की श्री संत शेख महंमद महाराज हे समकालीन संत आहेत त्यांचे १०ग्रंथ होते. काही गोष्ट बुद्धीला पटतात पण मनाला पटत नाही.किर्तनात जे काय बोलले जातात ते या गादीवरून समाजाचे हिताचे बोलले पाहिजे समाज सुधरला पाहिजे असे या ठिकाण्यावर सांगितले गेले पाहिजे जीवनामध्ये परमार्थ केले पाहिजे परमार्थ केल्याशिवाय जीवनाचा अर्थच नाही पण परमार्थ करताना त्यात शुद्धता असली पाहिजे नुसते समाजाला दाखवायाला करू नये हे करत असताना आपले चारित्र शुद्ध ठेवावी. मानवी जीवन जगत असताना मरण सर्वांना आहे पण मरेपर्यंत जगा पण शुद्ध चारित्र्य ठेवुन एकदा का आपल्यावर एखादा कलंक लागला की तो कायम पर्यंत राहतो समाज आपल्याला चांगले म्हणासाठी खुप प्रयत्न करावे लागते पण एक चुक झाली की काही मिनिटाच्या आत आपली समाजाच्या मनात उतरले जातो.संतानी आपल्याला एकत्र राहण्याचा संदेश आपल्याला देवुन गेले आहेत संतांना जातीचे पातीचे काही गरज नव्हता सर्व समाज एकत्र गुण्यागोंविदानी राहीला पाहिजे हे संतांना वाटंतय महाराज सांगतात की आपआपल्यातील युद्ध संपवा भांडण केल्यानी कोणाचे काही होत नाही उलट नुकसान फार होती पुर्ण कुटुंब एकत्र असल तर कोणाचा ताकद नाही आपल्या कुटुंबावर वाईट नजरेने बघण्याची. दुसराच्या अंगातील चांगुळपणा ओळखण्यासाठी स्वताच्या अंगी चांगुळपणा असावा तर आपल्याला लोक देव मानतील.माणसाने माणसाला माणसारखे वागणुक द्यावे ते देव केल्याशिवाय राहणार नाही स्वताला स्वताचा शोध स्वताच घेवा लागतो आयुष्य खुप सुंदर आहे ते चांगल्या पद्धतीने जगता आले पाहिजे आयुष्य जगताना प्रत्येकवेळी प्रयत्न केले पाहिजे खचुन न जाता आलेल्या संकटांना तोंड द्यावे.जगात जगत असताना माणसाने चांगल्या प्रकारे जगवे एकाना एक दिवस आपल्याला जायचे आहे पण चांगले कर्म करा जाती जातीत भांडण न करता प्रेमाने वागा

चैनल प्रमुख
विलास होले ( श्रीगोंदा)
9765195602

Комментарии

Информация по комментариям в разработке