चटपटीत आंबा डाळ | Amba Dal | कैरीची डाळ | Raw Mango Chutney | चैत्र महिन्यातील खास रेसिपी - आंबेडाळ

Описание к видео चटपटीत आंबा डाळ | Amba Dal | कैरीची डाळ | Raw Mango Chutney | चैत्र महिन्यातील खास रेसिपी - आंबेडाळ

#vegvarieties #vegrecipes #naivedya #naivedyamrecipes #vegrecipesmarathi #sproohaathalyerecipes
चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते. देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेपर्यंत गौरीची पूजा केली जाते. शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपात पूजली जाते.
कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरबऱ्याची डाळ असा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो.
आंबा डाळ - चैत्र महिन्यातील खास रेसिपी ‪@VegVarietiesRecipes‬ .
चैत्रगौरीच्या नवरात्रीला हमखास बनवला जाणारा हा पदार्थ आहे. चैत्र महिन्यात बाजारात कैर्‍या येऊ लागतात.

चटपटीत आंबा डाळ

साहित्य:
१ वाटी चणाडाळ
१/२ वाटी कैरीचा किस
३-४ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी: ४ चमचे तेल, १ लहान चमचा मोहोरी, १ लहान चमचा हिंग, १ लहान चमचा हळद
१/२ लहान चमचा साखर
मीठ
कढीपत्ता
कोथिंबीर

कृती :-
चणाडाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावी. भिजल्यावर सर्व पाणी काढून टाकावे. मिक्सरवर भरडसर वाटून घ्यावी. मिरच्यांचा ठेचा करून घ्यावा.
कढल्यात तेल गरम करावे त्यात मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालावे. हि फोडणी वाटलेल्या चणाडाळीत घालावी. मिठ, साखर घालावे. गरजेनुसार मिरचीचे तिखट घालावे. कैरीचा किस आणि कोथिंबीर घालून निट मिक्स करावे.

Maharashtrian recipe, typically made during these Summer days with green mangoes.
The Amba dal is extremely luscious to eat especially for all those who are mango maniac. Made with coarsely ground soaked channa dal and grated raw mango are mixed and flavoured with a spicy tadka or tempering of mustard seeds, , asafoetida, turmeric and curry leaves.
Amba dal also called ‘kairichi dal’ is a summer special Maharashtrian dish which is served as a snack and you can also serve it as a side dish with meals.

Delicious amba dal is made by combining grounded chana dal, grated raw mangoes and grated fresh coconut. It is spicy, tangy and slightly sweet in taste.

Комментарии

Информация по комментариям в разработке