Solapur चे हे ११ नेते आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार होतील ? | Assembly Election | Vishaych Bhari

Описание к видео Solapur चे हे ११ नेते आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार होतील ? | Assembly Election | Vishaych Bhari

Solapur चे हे ११ नेते आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार होतील ? | Assembly Election | Vishaych Bhari

सोलापूर हा महाराष्ट्रातील हॅपनिंग जिल्हा. म्हणजे धार्मिक पर्यटनासोबतच जातीय आणि धार्मिक सलोख्याची चिकार उदाहरणं आपल्याला सोलापूरमध्ये पहायला मिळतात. मराठा, लिंगायत, दलित, मुस्लिम, धनगर या समाजबांधवांची सोलापूर जिल्ह्यातील संख्या मोठी आहे. राज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घटनांचे पडसाद सोलापूरमध्ये तात्काळ पाहायला मिळतात. सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि कुटुंबीय, राजन पाटील, परिचारक कुटुंबीय, नरसय्या आडम मास्तर, दिलीप सोपल, संजय आणि बबन शिंदे, बागल कुटुंबीय, भालके कुटुंबीय, सुभाष देशमुख, विजय देशमुख ही सर्व सोलापूरच्या राजकारणातील दिग्गज मंडळी. मागील २५ वर्षांहून अधिक काळ या मंडळींचं सोलापूरमधील ११ विधानसभा मतदारसंघात वर्चस्व राहिलं आहे. यातली ३-४ नावं वगळता सर्वच जण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेली आणि घडलेली मंडळी. मागील १० वर्षांत मात्र यातल्या बऱ्याच जणांनी आपला राजकीय प्रवाह बदलला. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर या प्रवाहात आणखी खळबळजनक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आषाढी एकादशीचा मोठा पल्ला हा सोलापूर जिल्ह्यात येतो. विधानसभा निवडणुकीचे बिगुल त्यानिमित्ताने वाजायला सुरुवात झालीय असं समजायला हरकत नाही. मागील १० वर्षं भाजपच्या दोन वेगवेगळ्या खासदारांना संधी दिलेल्या भाजपला यंदाच्या निवडणूकीत मात्र काँग्रेसकडून पराभवाचा झटका बसला. प्रणिती शिंदे यांनी वडिलांच्या दोन वेळा झालेल्या पराभवाचा बदला घेत सोलापूरमध्ये काँग्रेसची हालचाल पुन्हा वाढवली. सोलापूर, माढा आणि धाराशिव या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने सोलापूर जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा जागांवर त्याचा परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचाच आढावा आपण या व्हिडीओत घेणार आहोत.....

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#solapur
#solapurnews
#solapurupdate
#solpaur
#pranitishinde
#ramsatpute
#vijaysinhmohitepatil
#dhairyasheelmohitepatil
#ranjeettsinghnimbalkar
#dilipsopal
#rajanpatil
#marathinews
#maharashtranews
#latestmarathinews

Комментарии

Информация по комментариям в разработке