ह्या ट्रिक ने बोंबील फ्राय करून तर बघा १००% कुरकुरीतच होतील | MALWANI CRISPY BOMBIL FRY RECIPE

Описание к видео ह्या ट्रिक ने बोंबील फ्राय करून तर बघा १००% कुरकुरीतच होतील | MALWANI CRISPY BOMBIL FRY RECIPE

नमस्कार, सर्वात सोप्या पद्धतीने एकदम कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

Like Our Facebook Page:
  / kitchen_9to5-106651208681717  

Follow Us On Instagram:
  / kitchen_9to5  

Follow us on Twitter:
  / kitchen_9to5  

जर तुम्हाला हि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ ला लाइक करा आणि आपल्या मित्र मंडळींसोबत शेअर करा. आणि हो आमच्या चॅनेल ला सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला सर्व व्हिडिओस चे नोटिफिकेशन्स मिळत राहतील.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

एकदम कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवावे?
How to make Crispy Konkan Style Bombil Fry?


साहित्य:

१. ४०० gram बोंबील
२.१ tbsp लाल तिखट
३. चवीनुसार मीठ
४. १ tbsp कोकम आगळ
५. १ tbsp हिरवी चटणी
६. अर्धा लिंबू
७. २ tbsp रवा
८.२ tbsp तांदळाचं पीठ
९. १ tbsp मालवणी मसाला

कृती :

१. बोंबील फ्राय बनवण्यासाठी ४००gm बोंबील घ्यावे.
२. सर्वात महत्वाची टीप म्हणजे सगळ्यात आधी लिंबू आणि मीठ लावून घ्यावे. त्यामुळे बोंबील फ्राय करताना चांगले कुरकुरीत होतील.
३. १ tbsp मीठ आणि अर्धा लिंबू पिळून बोंबील त्यात चांगले घोळवून घ्यायचे.
४. आता लगेचच बोंबील एका नॅपकिन वर रचून एखाद्या ५ किलो पर्यंतच्या वस्तूने दाबून ठेवावे.
५. बोंबील १ तासासाठी दाबून ठेवायचे. त्याहुन जास्त वेळ दाबून ठेवायची गरज नसते.
६. १ तासानंतर बोंबील नॅपकिन मधून काढून त्यांना मॅरीनेट करून घ्यावे.
७. मॅरीनेट करण्यासाठी १ tbsp हिरवी चटणी, १ tbsp लाल तिखट, पाव tbsp मीठ आणि १ tbsp कोकम आगळ घालावा.

हिरवी चटणी कृती *

हिरवी चटणी बनवण्यासाठी १ मोठी वाटी कोथिंबीर घ्यावी. त्यात ३-४ पाकळ्या लसूण, १ हिरवी मिरची आणि १ इंच आल्याचा तुकडा घालावा आणि पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावी.

८. मसाले बोंबील वर नीट लावून घ्यावे. बोंबील पुन्हा बाजूला ठेवण्याची गरज नसते. लगेचच फ्राय करायला सुरवात करू शकतो.
९. बोंबील फ्रायच्या कोटिंगसाठी २ tbsp रवा २ tbsp तांदळाचं पीठ आणि १ tbsp मालवणी मसाला किंवा लाल तिखट घालावं.
१०. तांदळाचं पीठ आणि रवा नेहमी सम प्रमाणातच घ्यावा म्हणजे तव्यावर फ्राय करताना रवा तव्यावर सुटणार नाही आणि बाइंडींग चांगलं होईल.
११. पॅन मध्यम आचेवर तापत ठेवून त्यात ४ tbsp तेल घालावं.
१२. बोंबील फ्राय करायला ठेवल्यावर सुरवातीचा फक्त अर्धा मिनिट गॅस मोठा करून बोंबील फ्राय करायचे म्हणजे सुरवातीलाच बोंबीलला छान कोटींग येते.
१३. अर्ध्या मिनिटाने गॅस मध्यम आचेवर ठेऊन बोंबील एका बाजूने नीट फ्राय होऊ द्यायचे.
१४. साधारण ३ मिनिटांनी बोंबील उलटवून दुसरी बाजू पण २-३ मिनिटांसाठी छान फ्राय होऊ द्यावी.
१५. पुन्हा एकदा बोंबील पलटवून घ्यावे आणि गॅस बंद करून सर्व्ह करून घ्यावे.
१६. चटपटीत आणि एकदम कुरकुरीत बोंबील गरमा गरम सर्व्ह करावे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

Chapters:

00:00 Introduction
00:20 Ingredients
00:41 How to select Bombil
00:53 Most Important Tip
01:10 squeeze the Bombil
01:47 Marinate the Bombil
02:24 Prepare coating for fry
03:00 Frying
04:35 Serve the Dish

-----------------------------------------------------------------------------------------------------------

#Kitchen9to5 #KurkuritBombilFry #BombilFry #OleBombilFry #CrispyBombilFry #BombayDuckFry #EasyBombilFry #bombil#bombayduck #fishfry #9to5 #malvanistyle #Malvanibombilfry #Malvanibombil


Kurkurit bombil fry, kurkurit bombil fry banvnyachi yogy padhat, Easy Bombil Fry, Dabun na thevta bombil fry kase banvave, Bombil fry recipe in marathi, Malvani Style bombil fry, Bombil fry recipe in marathi, Bombil fry recipe, Kurkure bombil fry kaise banaye, How to make crispy bombay duck fry, Bombilfry, how to make bombil fry, bombil fry, how to make fish fry, bombil fry recipe, crispy bombil fry, how to make sukh bombil fry, bombil fry recipe in marathi, bombay duck fry, how to make bombil fry recipe, bombil, how to make bombil recipe, how to make crispy bombil fry, how to make bombil fry recipe in marathi, how to make bombil curry, bombil fish fry recipe, bombil fry recipe in hindi, how to make bombay duck curry, how to make dry bombil fry, Bombil fish fry, Fish fry, Fish fry recipe in marathi, Fish fry recipe, Easy Fish fry, quick fish fry, Malvani bombil fry, Malvani Bombil

Комментарии

Информация по комментариям в разработке