UNCUT | सत्तेसाठी लाचार झालेल्या शिवसेनेनं युती केली, राज ठाकरे यांचं भाषण | पनवेल | एबीपी माझा

Описание к видео UNCUT | सत्तेसाठी लाचार झालेल्या शिवसेनेनं युती केली, राज ठाकरे यांचं भाषण | पनवेल | एबीपी माझा

अभिनेता अक्षयकुमारने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीत तुम्ही आंबा खाता का असा प्रश्न विचारला होता. त्यावरुन आज राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना जोरदार टोला हाणला. आज पनवेलमध्ये राज ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी नोटबंदी हा देश स्वतंत्र झाल्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा पुनर्रुच्चारही राज यांनी केलाय. आपण विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता, भाजपवाले वेगळ्याच वावड्या उठवत आहेत. भाजपनं देशातील सर्वच महत्वाच्या संस्थांची मुस्कटदाबी केली. डिजिटल इंडिया, कॅशलेश इंडिया, रोजगार निर्मितीचं आश्वासन आदी मुद्द्यांवरुन राज ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार घणाघात केला. तसंच सत्तेसाठी लाचार झालेल्या शिवसेनेचं भाजपसोबत युती केल्याची टीकाही राज यांनी केलीय.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ &    / abpmajhatv   &
  / abpmajha  

Комментарии

Информация по комментариям в разработке