EXCLUSIVE | दिलखुलास गावस्कर | सुनील गावस्करांशी खास बातचित | एबीपी माझा

Описание к видео EXCLUSIVE | दिलखुलास गावस्कर | सुनील गावस्करांशी खास बातचित | एबीपी माझा

सुनील गावस्करांनी एक जमाना आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीनं गाजवला. त्या जमान्यात फलंदाजीच्या दुनियेतल्या बहुतेक विक्रमांची ओनरशीप ही सुनील गावस्कर यांच्याकडे होती. एक समालोचक म्हणून त्यांनी आजही क्रिकेट खेळाशी नातं जपलं आहे. गावस्करांचं समालोचन आपण ऐकतो किंवा त्यांच्या फलंदाजीचे किस्से आपण ऐकतो, त्या वेळी आपल्याला वाटतं की सुनील गावस्कर म्हणजे एक गंभीर व्यक्तिमत्त्व असावं. पण वास्तवात गावस्कर इतके गोष्टीवेल्हाळ आहेत की, ते गप्पांची मैफल छान रंगवतात. दस्तुरखुद्द पुणेकरांनी शुक्रवारी सायंकाळी त्याचा अनुभव घेतला. निमित्त होतं अथश्री फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित सुनील गावस्कर यांच्या गौरव सोहळ्याचं. याच सोहळ्यात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी सुनील गावस्कर यांच्यासोबत गप्पांची मैफल रंगवली.

Комментарии

Информация по комментариям в разработке