Iran Vs Israel या दोन्ही देशांमध्ये चाललेलं युद्ध भारत थांबवू शकतो का? नेमके काय प्रयत्न सुरु आहेत?

Описание к видео Iran Vs Israel या दोन्ही देशांमध्ये चाललेलं युद्ध भारत थांबवू शकतो का? नेमके काय प्रयत्न सुरु आहेत?

#BolBhidu #IranVsIsraelWar #BenjaminNetanyahu

इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये सध्या युद्धासारखी परिस्थिती आहे. दोघांपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नाही. त्यातच अयातुल्लाह खोमेनी म्हणाले, "अफगाणिस्तानपासून येमेनपर्यंत आणि इराणपासून गाझा, लेबनॉनपर्यंत सर्व मुस्लीम देशांना कंबर कसावी लागणार आहे. इराण हेझबोलाबरोबर उभा आहे. इस्रायलला इराणने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. इस्रायलने आमच्यावर हल्ला केला तर इराणदेखील स्वस्थ बसणार नाही. पॅलेस्टाइन, लेबनॉन व इराणमधील इस्रायलच्या कारवायांमुळे आम्ही दुःखी आहोत, मात्र आम्ही पराभूत झालेलो नाही" पण जर या दोन देशांमध्ये युद्ध झाले तर ते कोणालाही परवडणारे नाही. म्हणूनच अनेक देशांकडून हे युद्ध रोखण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

त्यात भारताची भूमिका निर्णायक ठरु शकते. युद्धातून कधीही मार्ग निघत नाही. त्याने फक्त हानीच होते. हीच गोष्ट भारताने नेहमची जगाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भारत सगळ्यांना चर्चेतून मार्ग काढायला सांगतो. रशिया युक्रेन उदारण आपल्याला माहिती आहे. भारताच्या या भूमिकेमुळेच भारत या युद्धात मध्यस्थी करू शकतो अशी जगाला आशा आहे. म्हनुनच आता इस्रायलने भारतामार्फत इराणला संदेश पाठवला आहे. या संदेशात त्यांनी इराणला संयम आणि सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. भारत हे युद्ध थांबवू शकतो का? नेमके काय प्रयत्न सुरु आहेत? जाणून घेऊयात घ्या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке