अंबाळा गंगा दशहरा - २०२४ | रामटेक |

Описание к видео अंबाळा गंगा दशहरा - २०२४ | रामटेक |

रामटेक गड मंदिर स्थित महामुनी अगस्ती आश्रम चे स्व. संत गोलापदास बाबा यांनी धर्म आणि संस्कृतीचा प्रचार, प्रसार आणि रक्षण व्हावं म्हणून आयुष्यभर अविरत काम केले. त्यासाठी त्यांनी रामटेक मध्ये शोभायात्रा आणि गंगा दशहरा उत्सव साजरा करण्याची सुरुवात केली होती. त्यांनी या दोन्ही उत्सवाला या परिसरात प्रसिद्धी प्राप्त करून दिली ज्यामुळे त्या दिवसाला भाविकांची आणि पर्यटकांची वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढली असते.
गंगा दशाहार....
दरवर्षी साधारण जून किंवा जुलै मध्ये हा उत्सव साजरा केला जातो. ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या अंबाळा घाटावर दहा दिवस रोज सायंकाळी स्थानिक ब्राम्हणांद्वारा गंगेचं रूप समजून
अंबाळा तलावाची पूजा केली जाते. पाण्याच्या संकटाला दूर करण्यासाठी प्रजेच्या कल्याणाकरिता राजा भगीरथानी घोर तपस्या करून देवी गंगेला पृथ्वी वर येण्यास बाध्य केलं होत,हाच तो दिवस.
महामुनी अगस्ती आश्रम मधील अखंड धूनीद्वारे ज्योत प्रज्वलीत करून सायंकाळी नगर भ्रमण करीत अंबाळा येथे आणल्या जाते. स्थानिक ब्राम्हणांद्वारे विधिवत त्याचे पूजन केल्या जाते. आरती दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी तलावाच्या मधात एका नावेवर केली जाते. दुसऱ्या एका मुख्य नावेला हार - फुलांनी आणि सिरीज लावून सजविण्यात येते. त्याच्या मागे ट्रकच्या ११ ट्यूब वर तराफे बांधून जवळपास दोन हजार तेलाचे दिवे पेटवून ती नाव त्या गडद काळोख्या रात्री पूर्ण तलावात फिरवली जाते. आसमंतात फटाक्यांचे विविध रंग सजलेले असतात आणि या सर्वांचे सुंदर प्रतिबिंब अंबाळा तलावात बघणं एक सुंदर अनुभव असतो. मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलीत ज्योत तलावाच्या मधात विसर्जित केली जाते. काठावर हजारो भाविक दिवे आणि काकडे घेऊन मनोभावे माता गंगेची स्तुती करतात. यानंतर महाप्रसादाचे ग्रहण करून भाविक तृप्त होऊन आप - आपल्या घरी प्रस्थान करतात.

Комментарии

Информация по комментариям в разработке