कोकणातील झऱ्यांच्या पाण्यावर केली जाणारी 350 एकरातील सामूहिक देवशेती Summer Rice Cultivation

Описание к видео कोकणातील झऱ्यांच्या पाण्यावर केली जाणारी 350 एकरातील सामूहिक देवशेती Summer Rice Cultivation

कोकणातील झऱ्यांच्या पाण्यावर केली जाणारी 350 एकरातील सामूहिक देवशेती, पारंपारिक वायंगणी शेती
Summer rice cultivation
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी हे एक निसर्गसंपन्न गाव.या वायंगणी गावात हिवाळ्यात झऱ्याच्या पाण्यावर देवमळ्यात सुमारे 300 ते 350 एकर एवढ्या क्षेत्रात देवशेती केली जाते.तळकोकणात हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या भातशेतीला वायंगणी शेती म्हटले जाते. आणि याच वायंगणी नावावरुन गावालाही वायंगणी नाव पडलं असावं.या शेतीची मुख्य बाब म्हणजे शेती सुरवात ते शेवट,म्हणजे नांगरणी,पेरणी,लावणी,कापणी हे सर्व टप्पे देवाला विचारून कौल लावून सुरू केले जातात.या शेतीची सुरक्षा देव करतो.गावची ग्रामदेवता श्री देव रवळनाथ.देव रवळनाथाच्या हुकुमावरून ही देवशेती केली जाते.देवशेती मध्ये संपूर्ण गाव सामूहिकपणे शेती करतो,संपूर्ण गाव एकत्र आल्यामुळे मळ्यात जणू जत्राच भरली आहे असं वाटतं.गावात एकोपा आहे,वाद तंटे नाहीत.या देवशेती ची सुरवात हिवाळ्यात देवाचा कौल लावून केली जाते मग पुढील कामे टप्याटप्याने सुरू होतात.इथे बारमाही वाहणारे नैसर्गिक जलस्त्रोत, झरे आहेत.गावातील लोक या नैसर्गिक स्रोतांना नागझर बोलतात.पूर्वजांनी या झऱ्यांच्या पाण्याचे नीट व्यवस्थापन करून त्याचा उपयोग शेती साठी केला त्यामुळे इकडे वर्षातून दोन वेळा भातशेती करता येत होती पण आता वर्षातून एकदाच शेती केली जाते.शुद्ध झऱ्यांच्या पाण्यावर केलेल्या या शेतीच उत्पन्न देखील चांगलं येत.
या वायंगणी गावातील गावकऱ्यांनी पूर्वजांनी चालू केलेली ही देवशेतीची परंपरा अजून चालू ठेवली आहे आणि पुढे चालू ठेवतील....
या पारंपारिक देवशेती मधून आणि या वायंगणी गावाकडून शिकण्यासारखं हे की गावात एकोपा कसा असावा,नाती कशी जपावी हा निसर्ग आणि पूर्वजांची ही परंपरा कशी जपावी सोबतच अत्यंत महत्वाचं 'पाणी' पाण्याचं नीट व्यवस्थापन, नियोजन आणि पाण्याचं महत्व.पाणी वाचवणं किती गरजेचं आहे कारण पाणी नाही,तर जीवन नाही त्यामुळे पाणी वाचवा पाण्याचा दुरुपयोग करू नका .....
Save water

#farming #देवशेती #वायंगणी  #farm #farmer #konkan #kokanvideo #कोकण #शेती #भातशेती #कोकणातीलशेती #reel #shorts #vayangani #reel #reels #india #incredibleindia #rice #ricefarming #instagood #instagram #kokan #vayangani #nature #natural #water #savewater

Комментарии

Информация по комментариям в разработке