ज्ञानेश्वरीतील श्री गणेशवर्णन I ह भ प सौ पुष्पाताई कदम | दिनांक: १३ सप्टेंबर, २०२४

Описание к видео ज्ञानेश्वरीतील श्री गणेशवर्णन I ह भ प सौ पुष्पाताई कदम | दिनांक: १३ सप्टेंबर, २०२४

🚩|| गणेशोत्सवा निमित्त प्रवचन मालिका||🚩
🌹 ज्ञानेश्वरीतील श्री गणेशवर्णन 🌹

देवा तूचि गणेशु। सकलमतिप्रकाशु॥
म्हणे निवृत्तीदासु। अवधारिजो जी॥

या गणेश स्तवनाच्या ओव्या आपल्याला माहिती आहेत. पण, माऊलींनी या ग्रंथसिद्धीसाठी जे मंगलाचरण लिहिले ते आहे २१ ओव्यांचे. ’ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मियां।’ या ओवीशी ते संपते. माऊलींनी ही गणेशमूर्ती म्हणजे समस्त वेदवाङ्मयाची मूर्ती आहे, अशी कल्पना केली.
हे शब्दब्रह्म अशेष। तेंचि मूर्ति सुवेष।
तेथ वर्णवपु निर्दोष। मिरवत असे ॥३॥

असा हा श्रीगणेश म्हणजे संपूर्ण वेदवाङ्मयाची जणू उत्तम वेषधारी मूर्ती. त्याचे सुडौल शरीर ’वर्णवपु’ म्हणजे स्वर व्यंजनरुपी आहे, जे निर्दोषपणेझळाळत आहे! पुढे माऊलींनी त्याचा प्रत्येक अवयव, दागिने, फुले यांसाठीदेखील जी प्रतीके वापरली आहेत, त्यातून आपल्या समस्त प्राचीन वाङ्मयाचा ठेवा किती प्रचंड आहे, हे लक्षात येते.श्रीगणेशाची पूजा म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञानाची पूजा असे का म्हणतात, ते पटते.

स्मृती हे त्याचे अवयव आहेत आणि त्यांच्यातील अर्थसौंदर्यामुळे या अवयवांना डौल प्राप्त झाला आहे. १८ पुराणे म्हणजे त्याची आभूषणे व त्या अलंकारातील जी रत्ने आहेत, ते या पुराणातील तत्त्वज्ञान, तर त्यातील छंदमय पद्यरचना म्हणजे त्या रत्नांची कोंदणे. आमच्याकडील लालित्यपूर्ण काव्यप्रबंध हे त्याचे विविधरंगी वस्त्र. त्या वस्त्राचा पोत इतका दर्जेदार, तलम, चमकदार दिसतो आहे, तो या काव्यातील शब्द आणि अ��्थालंकारामुळे! त्याच्या पायातील लहान-लहान घंटा/घुंगरु म्हणजे जणू काव्यनाटिका. त्या नुपुरांचा झंकार म्हणजे त्यातील अर्थ! त्यातल्या तत्त्वसिद्धांतांची पाहणी कराल, तर उचित अशा पदांची लहान लहान रत्ने त्यातही दिसून येतील.

व्यासादी कवींची प्रतिभा म्हणजे त्याचे कटिवस्त्र. त्यांच्या शुद्धतेचे प्रतीक म्हणजे त्याच्या पदराला असलेल्या मौक्तिकमाला! जे निरनिराळे तत्त्वसंप्रदाय सांगितले जातात. (वेगवेगळे विचारप्रवाह ) ते याचे सहा हात आहेत. यांची मतभ��न्नता दर्शविण्यासाठी त्याच्या प्रत्येक हातात निराळे आयुध आहे. तर्कशास्त्र हा हातातील परशु. न्यायदर्शन हा अंकुश. हातातील मोदक म्हणजे ब्रह्मरसाने भरलेला वेदान्त!
आपल्या परंपरेत बुद्धमताला (तत्त्वज्ञानाला) शून्यमत (अपुरे -परिपूर्ण नाही असे) मानले जाते. त्याची त्रुटी दर्शविण्यासाठी तुटका दात हातात आहे.

सांख्यमताचा सत्कार म्हणजे त्याचा वरदहस्त, तर अभयहस्त म्हणजे धर्माची प्रतिष्ठा आणि गणेशाची सोंड म्हणजे तर ब्रह्मसुख. केवळ परमानंद! ती प्रतीक आहे अतिशय निर्मल, विवेकपूर्ण अशा योग-अयोग्यतेच्या विचारांचे! यासंदर्भातला परस्परातला संवाद म्हणजे त्याचे दात आणि त्या संवादातली नि:पक्ष वृत्ती म्हणजे त्या दातांची शुभ्रता.आपल्या आत स्फुरण पावणारे ज्ञान म्हणजे त्याचे बारीक डोळे. त्याचे दोन्ही कान म्हणजे धर्ममीमांसा व ब्रह्ममीमांसा.
 
सर्व ऋषिमुनी भुंग्याप्रमाणे सतत श्रवणचिंतनाचा मधुर गुंजारव करत त्याच्या गंडस्थलातून पाझरणार्या ज्ञानमदरूप अमृताचे सेवन करत आहेत, असे वाटते! द्वैत-अद्वैत ही दोन गंडस्थळे आहेत, ती वादविवादात तितकीच तुल्यबळ असल्यामुळे एकमेकांना खेटून बसली आहेत व ती श्रुती, स्मृती, वेद, पुराणे यातील तत्त्वार्थरुप पोवळ्यांच्या आभूषणाने तेजस्वी दिसत आहेत. उत्तम ज्ञानाचा मकरंद उदारपणे देणारी दहा उपनिषदे म्हणजे फुले, असे सर्व वर्णन झाल्यावर मग ‘अ’कार म्हणजे दोन्ही पाय, ‘उ’कार म्हणजे विशाल पोट व ‘म’कार म्हणजे मोठे गोल मस्तक.
 
हे तिन्ही एकत्र आल्यावर जो ओंकार तयार होतो, त्यात सर्व साहित्यविश्व सामावते म्हणून त्या आद��बीजाला मी सद्गुरुकपेने नमन करतो आणि मग वाणीचे नित्यनूतन अपूर्व असे विलास दाखवणारी, चातुर्य, शब्दकलाश्री, सर्व विद्या कला यांची सम्राज्ञी विश्वमोहिनी अशी जी शारदा, तिला नमन करतो.

ज्ञानेश्वरीतील श्री गणेशवर्णन त्याचा अध्यात्मिक अर्थ दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ रोजी गणेशोत्सवा निमित्त आदरणीय ह भ प सौ पुष्पाताई कदम यांच्या कडून श्रवण आपण करणार आहेत, सर्व साधकांनी यांचा अवश्य लाभ घ्यावा 🌹

🌹I ॐ गं गणपतये नम: I🌹

ज्ञानेश्वरीतील श्री गणेशवर्णन I ह भ ��� सौ पुष्पाताई कदम | दिनांक: १३ सप्टेंबर, २०२४ | सकाळी ११ ते १२ I 🌹
नियमित आध्यात्मिक श्रवण व आत्मोन्नती साठी खालील यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.

Youtube channel Link :
   / सिध्दसाधकसाधना  

🌹सिध्द साधक साधना 🌹

Комментарии

Информация по комментариям в разработке