NANDED | नांदेड मधिल शेतकऱ्यांनी कोथींबीरीतुन घेतले लाखोंचे उत्पन्न

Описание к видео NANDED | नांदेड मधिल शेतकऱ्यांनी कोथींबीरीतुन घेतले लाखोंचे उत्पन्न

नांदेड - बदलत्या हवामानामुळे शेतकरी अस्मानी, दुष्काळी, अतिवृष्टी, अशा समस्यांना तोंड देत असतो. आणि आता तर कापसावरील बोंडअळी अशा या कीटक रोगामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या पारंपरिक शेतीला फाटा देत नांदेड जिल्ह्यातील शिवणी भागातील शेतकऱ्यांनी कोथिंबीरी पिकाची लागवड करून, अवघ्या एक ते दिड महिन्यातच एकरी एक लाख रूपये उत्पन्न घेतले आहे.

किनवट आदिवासी डोंगराळ भागातील शिवणी अप्पारापेठ भागातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत गेल्या दोन वर्षापासून सतत कोथींबीरी पिकाची हजारो एकरवर लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत असल्याचे समोर आले आहे. शिवनी अप्पारापेठ भागातील गोंडजेवली, मलकजाम, दयाळ, धानोरा, शिवणी, झळकवाडी, तल्हारी, तल्हारी तांडा या भागामध्ये कोथींबीरी पिकाची लागवड करण्यात आल्याने शेतकरी कोथींबीरी पिकाचे एकरी लाखो रुपये उत्पन्न घेत असल्याची माहिती झळकवाडी येथील शेतकरी बापूराव काशिबा तांबारे आणि त्याच्या पत्नी सरस्पताबाई बापूराव तांबारे यांनी सांगितले आहे.

☛ Subscribe now our Youtube Channel:
   / @rnorightnewsonline6999  

☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/

☛ Follow Rightnewsonline:
  / rno02680723  

☛ Like us :
  / rnonewsonline  

☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]

☛ Contact Us:
9892600491

#RNO

Комментарии

Информация по комментариям в разработке