Shimga 2024 l शिमगोत्सव २०२४ l Varveli Sankasur l

Описание к видео Shimga 2024 l शिमगोत्सव २०२४ l Varveli Sankasur l

संकासूर - कोकणातील एक लोककला
संकासुराला ग्रामदेवतेचे प्रतीक मानतात. त्यामुळे नमनांच्या खेळांत संकासुरासह त्याचे दोन रक्षक असतात. तो लोककलेच्या रूपाने जिवंत राहिला आहे. शिमग्यात नमनखेळे येतील तेव्हा त्यांच्याबरोबर संकासुरही येईल.
संकासुर अंगात काळा कापडी पूर्ण अंगरखा घालतो, कमरेला सुमारे पंधरा किलो वजनाचा घुंगुरांचा वजनदार पट्टा बांधतो आणि नमन मंडळींसह सादर होतो; तो कलाकार प्रथम ग्रामदेवतेच्या मंदिरात दाखल होतो. मागील वर्षी देवीसमोर उतरवलेला पांढरी दाढी, टोपीवरील गोंड्यांची शोभा व जाड कापडाचा मुखवटा कलाकाराच्या चेहर्‍यावर चढवला जातो. तालवाद्यांच्या आणि टाळांच्या घनगंभीर घुमेदार आवाजात सजून पूर्ण झालेला संकासुर देवीच्या चरणी लीन होतो. नमन मंडळींसह नाचू लागतो. हातातील वेताने भक्तांना हळूच मारतोदेखील. संकासुराला देव मानले गेले असल्याने त्याची पूजा होते. त्याला नवस बोलला जातो. मागच्या वर्षीचा नवस पूर्ण झाला असेल तर तो फेडलाही जातो.
संकासुराचा प्रवास सुरू आहे… एका होळीपासून पुढील होळीपर्यंत…. आपल्या देवत्वाला लोककलेची झालर चढवून तो नाचतच राहणार आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке