शिराळ्यात यंदा नाईक विरुद्ध देशमुख अशी लढत पाहायला मिळेल | Shirala Vidhan Sabha

Описание к видео शिराळ्यात यंदा नाईक विरुद्ध देशमुख अशी लढत पाहायला मिळेल | Shirala Vidhan Sabha

#samratmahadik #mansingnaik #satyjeetdeshmukh

सांगली जिल्ह्यातील निसर्गाने नटलेला व डोंगरी भागात पसरलेला मतदारसंघ म्हणजे शिराळा होय... मतदारसंघाचे यापूर्वी शिवाजीराव देशमुख यांनी तब्बल 30 वर्षे नेतृत्व केलं होतं. त्यानंतर मतदारसंघात नाईक कुटुंबाची सत्ता प्रस्थापित झाली. सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटांचे मानसिंगराव नाईक हे विद्यमान आमदार आहे. तर त्यांचे पारंपारिक विरोधक शिवाजीराव नाईक हे सुद्धा शरद पवार गटात असल्याने, यंदा शिराळ्यात मानसिंग नाईक विरुद्ध भाजपच्या सत्यजित देशमुख यांच्यात लढत होईल. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे धैर्यशील माने निवडून आल्याने महायुतीच्या सत्यजित देशमुख यांना फायदा होऊ शकतो. भाजप अंतर्गत सम्राट महाडिक सुद्धा इच्छुक असल्याचे बोलले जातय... त्यामुळे भाजपला उमेदवारी देताना दोन उमेदवारांमध्ये समन्वय घडवून आणावा लागेल. सध्या तरी देशमुख विरुद्ध नाईक अशीच लढत होईल यात काही शंका नाही.. विधानसभेचा आढावा घ्यायचा झाला तर सध्या लोकसभेनंतर शिराळा मतदारसंघात काय वातावरण आहे..आणि येणाऱ्या परिस्थिती कोणाच्या बाजूने अनुकूल असेल याचाच हा घेतलेला थोडक्यात आढावा…

Комментарии

Информация по комментариям в разработке