सुका बोंबिल मसाला

Описание к видео सुका बोंबिल मसाला

#proteinfood
#richin calcium
#goodfor teeth,hair


सुक्या बोंबलाचं सुकं

हे बोंबिल उन्हाळ्यात आणून तुकडे करून ठेवायचे असतात. फ्रीजमधे दोनतीन पिशव्यांत घालून खालच्या युनिटमध्ये ठेवून द्यायचे. जास्त असले तर उन्हं दाखवून प्लास्टिक बरणीत भरून ठेवतात.
बोंबिल असेच गेसवर भाजून खाल्ले तरी त्यांच्यासोबत दोन घास जास्त जातात. तव्यावर टाकून भाजता येतात.
बोंबलाचं सुकं करण्यासाठी सकाळीच थोडे बोंबलाचे तुकडे भिजत ठेवते. दोनेक तासात उंबळतात मग ते साफ करायचे, हाताने.. म्हणजे कल्ले काढून टाकायचे, पोटातलं काढून टाकायचं नि पुन्हा पाण्याखाली धरायचे. एक लसणीच्या कांद्याच्या पाकळ्या सोलून चांगल्या ठेचून घ्याव्यात. कढईत तेल गरम करून त्यात ठेचलेला लसूण परतायचा. त्या पाकळ्या लालसर झाल्या की त्यात दोन बारीक चिरलेले कांदे परतत रहायचे. ते लाल झाले की मालवणीमसाला, चिमटीभर हळद परतायचं. यात धुतलेले बोंबिल अलगद परतून वरतून बेताने मीठ पेरायचं कारण बोंबलाला मीठ असतं. पाचसहा आमसूलं टाकून वाफेवर शिजवायचं. भिजत घातलेले असल्याने लगेचच शिजतात. जरासं तेल वरतून घालायचं नि अलगद परतायचं की झाले तयार.

बोंबिलबटाट्याचा रस्साही भारी होतो.
भोंबिल असेच भिजत घालून साफ करायचे. कढईत दोन चमचे तेल गरम करून त्यात बटाट्याच्या फोडी परतायच्या. मालवणीमसाला परतायचा, मग भोंबिल परतायचे नि वाफेवर शिजत आले की कांदाखोबऱ्याचं वाटण चारेक मोठे चमचे घालायचं, पाचसहा आमसुलं किंवा आगळ जे असेल ते. चवीपुरतं मीठ घालून मंद आचेवर रटरटू द्यायचं. वाफाळत्या भातासोबत असं लागतं की जीभ अगदी खूष होते.
ओले बोंबिल फ्राय

हे मी लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी शिकले. लेकाला आवडायचे म्हणून शिकावे लागले. ओले बोंबिलमधे चिर देऊन घ्यायचे मच्छीवालीकडून.. तसे देत नसली तर पुढचीकडे जायचं. भोंबिल स्वच्छ धुवून भांड्यातच ठेवायचे, जे पाणी सुटतं ते दोन वेळा फेकून द्यायचं. आता या तुकड्यांना मीठ बेताचं कारण पातळ असतात, तिखट, हळद, कोकम आगळ चोपडायचं नि अर्धातास ताकधिनाधिन करू द्यायचं. तव्यात जरासं तेल गरम करत ठेवायचं. तवा चांगला गरम झाला पाहिजे मग तांदळाच्या पीठात तिखट, हळद मिक्स करून त्यात बोंबिल दाबायचे. एकदा दाबून जरा बाजूला ठेवले की पुन्हा दोनेक मिनटांनी परत तसंच डबल कोटींग करायचं नि मग तव्यात गोलाकार मांडायचे. आच मध्यम ठेवायची. बोंबलाची पाठ भाजत आली की हळूहळू अलगद परतायचे. हे बोलतेय तितकं सोप्पं नाही. बऱ्याचदा बोंबिल तव्यावरनं सुटता सुटत नाहीत. सडसडीत बोऔबिल भाजून होण्यासाठी काय लागतं तर खूप सारा सराव. एकदा हातवळणी पडले की येतात..घावण्यांसारखंच. बोंबिल मात्र ताजे मिळायला हवेत..रंगाने तोंड लालगुलाबी केलेले घेऊ नयेत. अगदी लहान तसेच अगदी मोठेही घेऊ नयेत. मोठ्यात कुसरं असतात म्हणजे त्याचे काटे. मध्यम आकाराचे घ्यायचे असतात.
   • माळ्यावरचं भूत #स्वलिखित #marathikath...  

Комментарии

Информация по комментариям в разработке