आगरी झणझणीत मटण रस्सा l Agri zanzanit mutton rassa l आगरी कट्टा l Agri katta# mutton# agri mutton

Описание к видео आगरी झणझणीत मटण रस्सा l Agri zanzanit mutton rassa l आगरी कट्टा l Agri katta# mutton# agri mutton

आगरी झणझणीत मटण रस्सा

साहित्य :

अर्धा किलो बोकडाचे मटण
दोन मोठे कांदे
दोन मध्यम टोमॅटो
आलं
लसूण
हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
हळद
आगरी मसाला
सुकं खोबरं
लवंग
तमालपत्र
काळी मिरी
चक्रफुल
मीठ
तेल

कृती :

1) मटण स्वच्छ धुवून हळद मीठ लावून कुकरला 5-6 शिट्या काढून घ्या.
2) कुकर उघडून त्यात मध्यम आकाराचे दोन बटाटे सोलून तुकडे करून टाकून पुन्हा एक शिटी काढून घ्या.
3) मटण आणि बटाटे शिजले आहेत का ते बघून घ्या नसतील तर पुन्हा कुकरला लावा.
4)पातेल्यात तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घ्या. कांदा लवकर शिजण्यासाठी त्यात चिमूटभर मीठ टाका.
5)कांदा तांबूस झाल्यावर तमालपत्र, काळी मिरी, लवंग, चक्रीफूल टाकून परता.
6)आपण बनवलेली एक मोठा चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालून परता.
7) टोमॅटो बारीक चिरून घाला व तेल सुटेपर्यंत परता.
8) तेल सुटू लागल्यावर एक चमचा हळद, चार चमचे आगरी मसाला, भाजून बारीक केलेले सुकं खोबरं घालून परता.
9 ) नंतर मटण घालून हलक्या हाताने परता.
10)पातेल्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ओता
11)पाणी गरम झाल्यावर झाकण काढून गरम पाणी त्यात टाकून 5 मिनिटे उकळी काढून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करा.

🙏 धन्यवाद 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке