Bola ho majhyashi Deva (बोला हो माझ्याशी देवा) - by Shridhar Ghanekar

Описание к видео Bola ho majhyashi Deva (बोला हो माझ्याशी देवा) - by Shridhar Ghanekar

बोला हो माझ्याशी देवा |
तुम्हीच मजवरी रुसल्यावरती |
बोलू मी कोणाशी || धृ ||

देह वाहिला तुमच्या पायी |
जिवाशिवाची आशा नाही |
कानी पडतील बोल प्रभुचे |
आशा हीच उराशी || १ ||

तुम्हीच मजला बोल शिकविले |
आज मौन का तुम्ही घेतले |
बोल शिकवुनी माय अबोला |
धरिते का पिल्लासी || २ ||

बोलायाचे नसेल जरी का |
बोलू नका पण इतुके ऐका |
कमलाक्षातुनी कटाक्ष फेका |
मजवरती अविनाशी || ३ ||

गायक: श्रीधर घाणेकर
संवादिनी: महेश घाणेकर
तबला: मंदार घाणेकर
कोरस: प्रकाश मेहेंदळे, राजेंद्र कार्लेकर
झांज: राजेंद्र कार्लेकर

Комментарии

Информация по комментариям в разработке