"सदगुरुनाथा हात जोडीतो",SadguruNatha Hath Jodito

Описание к видео "सदगुरुनाथा हात जोडीतो",SadguruNatha Hath Jodito

#वासुदेवसंगीतसभा #vasudevsangeetsabha
गायिका-सौ. कल्याणी कुळकर्णी आमलेकर
निवेदन-आदरणीय दादा,श्री.अजित कृष्ण तुकदेव
वासुदेव संगीत सभा,'श्री वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे
||श्री श्रीमद् सद्गुरूसंग||
आज ज्या पदाच्या आर्षतेच्या व ‘परे’तून ‘परे’ला साद घालतांना, वाणीच्या अती उत्कट स्वरुपाच्या अंनुसंधानातून, आपण ज्याचा बोध करून घेणार आहोत, त्यासाठी स्वत्वातून आत्मतत्वाकडे व परमतत्त्वाकडे प्रवास करणार्‍या, स्वानुभवाची समृद्धी असणार्‍या, एक प्रकारच्या साधक-सिद्धत्वाची गरज आहे. ‘सद्गुरूंचे त्यांच्या सद्गुरुंपाशी’ असलेल्या हितगुजाशी आपल्याला आपले कान भिडवायचे आहेत, जाता-जाता? सामान्य मानसिक पातळीवर जीवन जगतांना, व्यवहारामध्ये आपला ताल-तोल सांभाळतांना, पूर्ण कसरत करून दमल्या भागलेल्या अवस्थेत ऐकण्याचे हे पद नव्हे.
प. प. श्रीमद थोरल्या स्वामी महाराजांचे हे पद, त्यातील प्रत्येक शब्दाच्या हृदयात व त्याचा आंतरिक वेध घेऊन त्या ‘पद’-महालात शिरल्याशिवाय, हृदयात दिव्यत्वाचे स्फुरण व सद्गुरूंचे अधिष्ठानरूपी वास्तव्य असल्याशिवाय, ह्याचा सुगंध व भक्तिज्ञानाचा दर्प आपल्याला जाणवत नाही.
सप्त ज्ञान भूमिकांच्या स्पर्शाने सद्गुरूंचे रूप जाणणार्‍या व नवविधा भक्तीच्या पलीकडील दत्तात्रेयांचे वेदोमय अपौरुषेय रूप ओळखणार्‍या एका महान विभूतीची ही रचना होय. सगळे जाणल्यानंतर एक वेगळीच जाणिवेची विफलता, अती आर्त व उत्कट अक्षर शब्दांमध्ये व्यक्त होत गेली.
ज्या सृष्टीत संचाराच्या निमित्ताने सद्गुरूंच्या, भगवान दत्तात्रेयांच्या विशाल व्यापक तत्त्वातीत रूपाचा मागोवा घेता घेता, व्यष्टि-समष्टीचा संवाद पेलता पेलता, सगळे काही जाणल्यानंतर अजून काही जाणायचे आहे, सद्गुरुंशी काहीतरी हितगुज साधायचे आहे, अशा मनाच्या अती आर्त व व्याकूळ भावनेतून निर्माण झालेले हे पद, हाच त्याचा आविष्कार होय!
आपल्या स्वतःच्या आचार-विचार-साधनेतून, निर्माण झालेल्या दृष्टीने, वर सांगितल्याप्रमाणे आढावा घ्यायचा आहे. निर्गुण भूमिकेतून निर्गुण निराकाराला ‘हात जोडून’ सगुणात हितगुजाच्या पायरीवर साकारणार्‍या ह्या पदात परमोच्च जाणीव व्यक्त होतेय, प्रगट होतेय.
निशिदिनी माझ्यासाठी ‘श्रम घेणार्‍या’ हे माझे ‘गुरो’ तुमचा शीण मी कसा घालवू? हृदयस्थ आहात, जाणवत आहात, पण दिसत नाही; असे का? व मी असा का?
ज्ञान-भक्ति-कर्म-योगोत्तर भूमिकेत वावरणार्‍या, ‘आत्मक्रीड’ असे बिरुद असणार्‍या व श्वासाचेही गुरुदेवांशी अंतर नसणार्‍या स्वामींना, उपकारातून उत्तीर्ण कसे व्हावे असा प्रश्न पडतो ? खरच, स्वतःच्या आत खोल जा, तुम्हाला प्रश्न जाणवेल?
हे पद, ही प्रार्थना, ही भूमिका भक्तिसागराच्या अथांग जलाशयात घेऊन जाते. स्वतःला या जलाशयात ढकलून द्या. अजाण-भ्रमित-हतबल अशी माझी अवस्था झालीय, असे स्वामी महाराज म्हणतात ते नेमके कुणासाठी? हितगुज नेमके कशाविषयी? व चिंता नेमकी कुणाची?
मायासागर निरसून, दावी अनुभव - कुणाला?
“ प्रचिती नको पाहू ”
ही प्रार्थना, ही विनवणी – गुरुदेवांपाशी!
हे तुमचे व माझे.. महाराजांशी हितगुज.. पूर्णत्वाला जावे.
बस..
वासुदेवांचे चरण !

Комментарии

Информация по комментариям в разработке