रंगपंढरी Face-to-Face: Girish Oak - Part 2

Описание к видео रंगपंढरी Face-to-Face: Girish Oak - Part 2

आजचा एपिसोड थोडा वेगळा आहे.

सुरुवातीच्या काळातला संघर्ष हा प्रत्येक कलाकाराच्या कारकीर्दीतील अपरिहार्य टप्पा. महत्त्वाचा असला तरी ह्यावर बोलताना प्रत्यक्ष अभिनयप्रक्रियेपेक्षा स्मरणरंजन अधिक होईल म्हणून मुद्दामहूनच रंगपंढरी मध्ये आजवर फार न भर दिला गेलेला हा विषय.

पण एका अर्थाने पाहिलं तर संघर्ष हा सुद्धा प्रक्रियेचाच भाग म्हणता येईल का? म्हणूनच सुप्रसिद्ध अभिनेते डॉ गिरीश ओक ह्यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने आज ह्यावर सविस्तर बोललं जाणार आहे. संघर्षाच्या काळातील आव्हानांचा केवळ सामनाच नव्हे तर ह्या प्रतिकूल अनुभवांचा अधिक चांगला अभिनय करायला कसा उपयोग करून घ्यावा हे गिरीश सर सांगणार आहेत. ह्याबरोबरच भाषेचा सराव, आवाजाची फेक, संवादातील लयबद्धता, दिग्दर्शकांकडून अधिकाधिक शिकून घेण्याची प्रवृत्ती ह्याबद्दलही ऐकायला मिळणार आहे.

३५ वर्षांपासून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत असलेल्या गिरीश सरांनी २० हजार हून अधिक नाट्यप्रयोग केलेले आहेत. 'दीपस्तंभ', 'आकाशमिठी', 'कुसुम मनोहर लेले', 'तो मी नव्हेच', 'सुंदर मी होणार' , 'श्री तशी सौ', 'ज्याचा त्याचा प्रश्न', 'अभिनेत्री', 'सुखांशी भांडतो आम्ही', 'लव्हबर्ड्स', 'मी बाई सहावारी', 'ती फुलराणी', 'यु टर्न', 'वेलकम जिंदगी' अशा अनेक नाटकांतून गिरीश सरांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवला आहे. चैतन्यमय व्यक्तिमत्त्व, नायक असो वा खलनायक - कुठल्याही व्यक्तिरेखेला सहज आत्मसात करण्याची हातोटी, आणि विलक्षण सुंदर संवादफेक ह्यासाठी रसिकांचे अतिशय आवडते असलेले गिरीश सर उलगडताहेत त्यांची अभिनयप्रक्रिया.

Please watch, comment and share. And remember to Subscribe to Rang Pandhari YouTube Channel.

Комментарии

Информация по комментариям в разработке