श्रीदुर्गा सप्तशती पाठ पठण - डॉ. अपर्णा कल्याणी

Описание к видео श्रीदुर्गा सप्तशती पाठ पठण - डॉ. अपर्णा कल्याणी

आपल्या प्राचीन वाड्.मयात श्रीजगदंबा देवीचे स्वरूप,सामर्थ्य आणि पराक्रम यांचे वर्णन करणारी अनेक स्तोत्रे,आख्याने,ग्रंथ प्रसिद्ध आहेत. या चंडी स्तवनपर आख्यानांमध्ये मार्कंडेय पुराणातील श्रीदुर्गा सप्तशती(देवी माहात्म्य) आख्यान आपल्याला अधिक प्रिय असल्याचे स्वतः देवीने सांगितलेले आहे.त्यामुळेच आसेतुहिमाचल दुर्गा सप्तशतीचे पठण आणि उपासना अत्यन्त श्रद्धेने केली जाते.आदि शक्तीने महाकाली,महालक्ष्मी, महासरस्वती या सगुण रूपांनी अवतरित होऊन महिषासुर, चंड,मुंड, शुंभ,निशुंभ,रक्तबीज,धूम्रलोचन यांसारख्या असंख्य राक्षसांचा नि:पात केला. तेरा अध्याय आणि सातशे श्लोकांमध्ये देवीचे पराक्रम ग्रथित केले आहेत. सप्तशतीच्या उपासनेने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.सप्तशती च्या पाठाची फलश्रुती अपूर्व आहे.हा पाठ करता येणे पुष्कळांना शक्य होत नाही,म्हणून नवरात्र काळात किंवा वर्षभर केव्हाही हा पाठ आपण घरात लावून ठेवला तरी सप्तशतीत वर्णन केलेल्या फलश्रुतीची अनुभूती आपणांस निश्चितपणे येईल.समोर पोथी ठेवून श्रवण केले तर हळूहळू आपल्याला सप्तशती शिकताही येईल.धन्यवाद!🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке