देवाचा डोंगर | Sacred Mountain of Sawantwadi

Описание к видео देवाचा डोंगर | Sacred Mountain of Sawantwadi

हिरवाईने नटलेला पश्चिम घाटातील घनदाट जंगलांनी वेढलेला जैव विविधतेचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जाणारा आपला सिंधुदुर्ग जिल्हा अश्याच समृध्द सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत आला आहे..
सिंधुदुर्गातील प्रत्येक गावात छोट्या मोठ्या नद्यांचे उगम असलेले डोंगर आहेत , पाणथळ जमिनी आहेत , कांदळवन किंवा समुद्र लगतचे डोंगर सडे आहेत..ह्यातले अनेक समृध्द डोंगर देवाच्या नावाने पुजले जातात तिथे वन्यप्राण्यांचा अधिवास असतो आणि अशा जागा पर्यावरण संवेदनशील असतात...

सावंतवाडी जवळील कुनकेरी नावाच्या गावातील जंगलात राहणाऱ्या गुरु वराडकर ह्या युवकाला डोंगरावरील गुहेत स्थानिक वाघ दिसला तो त्याने त्याच्या कॅमेरात टिपला ..
विशेष म्हणजे ज्या गुहेत हा वाघ दिसला ती गुहा आणि डोंगर गावातील लोक देवाच्या नावाने पूजतात इथल्या नैसर्गिक अधिवासा ला धोका पोचेल असे कोणतेही कृत्य करू नये यासाठीच हा डोंगर देव म्हणून पुजला आहे...अर्थातच निसर्ग पूजक संस्कृती चा हा ठेवा आहे...

Комментарии

Информация по комментариям в разработке