कोकणातील यात्रा खास आकर्षण जपल्या जातात अनेक परंपरा

Описание к видео कोकणातील यात्रा खास आकर्षण जपल्या जातात अनेक परंपरा

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील हिंदु मुस्लिम बौद्ध बांधवांचे  ऐक्याचे प्रतीक असलेल्या  सातशे वर्षांची परंपरा लाभलेल्या   लाटवण भैरी भवानीची  यात्रा  उत्साहात पार पडली , भैरी भवानी यात्रेला हिंदु -मुस्लिम , बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात ,भैरी भवानी यात्रेचा मान पूर्वापार पद्धतीने कदम भावकीचा असतो तसेच या देवीच्या   यात्रेचे  उत्सव  मानकरी सात गाव असतात, . लाटवण गावातील मान कऱ्याला लाटेचा(बगाड ) मान असतो , त्याला बगाड्याला म्हणजे उंच लाकडाला बांधून फिरवले जाते .

  चैत्र महिन्यात कोकणात अनेक गावात देव देवतांचे यात्रा साजरी केली जाते, या दिवशी प्रथम देवाला शृंगाराने सजविले जाते, त्यांना पालखीत बसले होते ढोल-ताशांच्या गजरात सर्व देवांची आरती केली जाते व त्यांचा मानपान दिला जातो ,जशी संध्याकाळ होते तशी आजूबाजूच्या गावातील प्रत्येक देवाची काठी वाजत-गाजत लाटवन येते प्रथम चंडिका मातेची काटे ची पूजा केली जाते ,नंतर दक्षिणेकडील एका विशिष्ट खडकावर देवांचा मांड भरला जातो प्रथम सर्व काठ्यांची पूजा केली जाते त्या ठिकाणी प्रथम विडा दिला जातो नंतर संपूर्ण काट्यांचा समा भरला जातो त्या सभांमध्ये बहीण भावांची भेट होऊन पूजाअर्चा केली जाते नंतर मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सर्व काट्या वाजत गाजत देवांच्या सहाने पाशी आणतात सहाणा म्हणजे देवांच्या पालखीचे मुख्य स्थान तिथे सर्व काट्यांचे व पालखीचे आगमन होते येथे पालखीचे पूजा केली जाते ज्याने नवस केले असतील अशा सर्व भाविक आरतीचे ताट घेऊन देवाला साथ गेल्या मारून खांबाच्या काल काय मातेलाही सात फेऱ्या मारतात नंतर त्या सर्वांचा जो मानकरी उपासक असेल त्याला देवळातून वाजत गाजत लाटेवर आणले जाते त्यानंतर सुरू होते  गावदेवी चा लाटेचा मुख्य कार्यक्रम अशीही लाटवण ची भैरी भवानी ची यात्रा सर्वदूर परिचित आहे






  रत्नागिरी जिल्ह्यातील  लाटवण भैरी भवानी   यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून , पिंपळगाव ,देवाचा डोंगर, भोळवली ,दाभट , वलोते , कादवन , तळेघर  सात गावे या यात्रेचे मानकरी आहेत ,  पंचक्रोशीतील भाविक  यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद  देतात ,  कोणताही अनुचित प्रकार घडत  नाही .





भैरवनाथ मंदिराच्या दक्षिणेस खांबा खालची काल काय माता त्या चौथऱ्यावर एक सागाचा भलामोठा तीस ते पस्तीस फुटी खांब उभा असतो त्यावर जत्रेनिमित्त दोन माळी बांधले जातात त्याला बगाड असे म्हणतात त्यावर चढण्या करता भलीमोठी लाकडी शिडी लावली जाते या बगाडाचा मधल्या सागाच्या खांबावर आपली भैरवनाथाची लाट बसवली जाते या लाटेला दोन्ही बाजूस जमिनीपर्यंत लांब दोरखंड सोडले जातात त्याच दोरखंडाने ही लाट फिरवली जाते हा लाटेचा कार्यक्रम जवळ जवळ अर्धा तास चालतो  ,लाट म्हणजेच बगाड यावर उपास  कऱ्याला दोरखंडाणे उलटा बांधला जातो, त्याच्या हातात दुधाचे व पाण्याचे पात्र देऊन धार सोडली जाते तेव्हा खालील लाट फिरवणारी मंडळी लाटेचे दोरखंड घेऊन सात फेऱ्या मारतात नंतर देवीचे काल काय मातेसमोर गण गवळण सादर करून तमाशा करतात भाविक देवाला नारळ फळे पेढे अगरबत्ती अशा वस्तू अर्पण करतात

 लाटवण पंचक्रीशीतील  सात देव देवीच्या  भाऊ , बहिणी एकत्र भेटतात , रात्रभर यात्रा पालखी भेट, काठी मान , बगाडा च्या  लाटेवर मानक-याला बांधले जाते , 

या यात्रेचे खास आकर्षण असते,

ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात हजेरी लावता , देवीची ओटी माहेरवाशीण कडून भरली जाते 

लाटवण पंचक्रोशीतील लोक भैरी भवानी ची यात्रा निर्विघनपणे पार पाडतात,  कोणताही अनुचित प्रकार घडत नाही ,गेल्या अनेक वर्षांची  परंपरा सुरू असून  पुढील पिढीकडे हस्तांतरित होत आहे , कदम 7 भावकीचे मान असून , लाटवन पिंपळगाव गाव या दोन गावाचा खास मान आहे 

Комментарии

Информация по комментариям в разработке