Vidhan Sabha निवडणुकीतल्या अपयशानंतर Uddhav Thackeray गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार ? चर्चा काय ?

Описание к видео Vidhan Sabha निवडणुकीतल्या अपयशानंतर Uddhav Thackeray गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार ? चर्चा काय ?

#BolBhidu #UddhavThackeray #MVA

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दोन गोष्टींच्या प्रमुख चर्चा चालू आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार गट राष्ट्रवादीत आणि उद्धव ठाकरे गट शिवसेनेत मर्ज होणार का? चर्चेत असणारी दुसरी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी आगामी काळात एकसंध राहणार की नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय. या पराभवामुळं महाविकास आघाडीला विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदसुद्धा मिळणं अवघड झालंय. अशात महाविकास आघाडीचे नेते पराभवाचं खापर एकमेकांवर फोडतायंत. ठाकरे गटानं मंगळवारी आपल्या पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. त्यात ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांनी आपल्या पराभवाचं खापर पहिल्यांदा एव्हीएमवर फोडलं. त्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी ठाकरे गटाचं काम न केल्याचा आरोप केला.

याच बैठकीत ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केल्याचं बोललं जातंय. या मागणीवर उद्धव ठाकरेंनी काही निर्णय घेतला नसून मित्रपक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा, तो आगामी काळात घेतला जाईल असं म्हटलंय. पण महाविकास आघाडीतून बाहेर पडा, या ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांच्या मागणीवरून आणि उद्धव ठाकरेंनी याबाबत पाळलेल्या जाणीवपूर्वक मौनावरून आगामी काळात ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडेल काय, असे प्रश्न विचारले जातायंत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे ठाकरे गट मविआतून बाहेर पडू शकतो, अशाही शक्यता वर्तवण्यात येतायंत. पण खरंच उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतो का? बाहेर पडल्यास त्याची कारण काय असतील

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке